मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ शपथ घेतो की…; भुजबळांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली असून त्यांना अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता आहे.मुंबई: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन इथं राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना डावलण्यात आले होते. मात्र आता सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा भुजबळ यांचे मंत्रिमंडळात कमबॅक झाले असून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी त्यांची वर्णी लागली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना अटक झाल्यानंतर वाल्मिक कराड याच्याशी जवळीक असल्याच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी मार्चमध्ये राजीनामा दिला होता.

तेव्हापासून राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा रिक्त होती. दुसरीकडे, मंत्रिमंडळात सहभाग न झाल्याने भुजबळ नाराज होते. ही नाराजी इतकी टोकाची होती की, भुजबळ पक्ष सोडणार या चर्चांना उधाण आले होते. अखेर भुजबळ यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेली अन्न व नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षण ही खाती छगन भुजबळ यांना मिळणार असल्याची दाट शक्यता आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून राजकारणात सक्रिय असलेले छगन भुजबळ हे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

पुढे त्यांनी मुंबईचे महापौर म्हणूनही काम पाहिलं. मात्र शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर १९९१ साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर १९९९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीने पुन्हा एकदा भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन करत २०१९ साली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद दिले होते. २०२३ मध्ये राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणे पसंत केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.