हेरगिरीवरून बारा जण अटकेत; पाकिस्तानने भारताच्या हवाई दलाचे फोटो-व्हिडिओ मागवलेले, पाकचे नेटवर्क उघडकीस.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या १२ जणांना अटक झाली आहे. ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरसह काही महिला पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होत्या. अधिकाऱ्याने हवाई दलाच्या तळाची छायाचित्रे मागितली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांवरून गेल्या दोन आठवड्यांत एका यूट्यूबरसह १२ जणांना पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानशी संबंध असलेल्या हेरगिरीच्या नेटवर्कचा हे सर्व जण भाग होते, अशी माहिती तपासात समोर येत आहे.यापैकी सहा जणांना पंजाबमधून, तर चार जणांना हरियाणामधून अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमधील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह दोन महिला नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात होत्या, असा आरोप आहे. या पाकिस्तानी अधिकाऱ्याची भारताने १३ मे रोजी हेरगिरीच्या आरोपावरून हकालपट्टी केली.हे आरोपी संवेदनशील माहिती पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हजला पुरवत होते, अशी माहिती आत्तापर्यंतच्या पोलिस तपासावरून समोर आली आहे.

या सर्वांचे आर्थिक व्यवहार आणि त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फोरेन्सिक विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.नूह पोलिसांनी सीआयएच्या मदतीने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अटक केली. महंमद तारीफ असे त्याचे नाव असून तो कांगरका येथील रहिवासी होता. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला सिमकार्ड पुरवल्याची कबुली त्याने दिली आहे.पाकिस्तानी अधिकाऱ्याकडून पैसे घेतल्याची आणि त्या बदल्यात अधिकाऱ्याने संवेदनशील माहिती देण्याची मागणी केल्याची कबुली महंमद तारीफ याने दिली आहे. तो म्हणाला, ‘मी २०१८ मध्ये व्हिसासाठी पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात गेलो.

माझी मुलाखत घेण्यात आली. त्याने माझा नंबर घेतला. तीन-चार दिवसांनी अधिकाऱ्याचा फोन आला आणि त्याने व्हिसा हवा असल्यास दोन नवे सिम कार्ड द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार नूहमधून मी दोन नवे सीम घेतले आणि त्याला दिले. त्यानंतर त्याने पुन्हा फोन केला आणि व्हिसासाठी आठ-दहा जणांना पाठव असे सांगितले. असे मला सांगितले. त्यानुसार मी पाठवले. त्याचे पैसे त्याने मला दिले. २०२४ मध्ये त्याने मला बोलावले आणि त्याने माझी ओळख जाफर या अधिकाऱ्याशी करून दिली. जाफरनेही माझ्याकडून दोन सिम कार्ड घेतले. त्यानंतर त्याने मला पुन्हा फोन केला आणि हवाई दलाच्या सिरसा तळाची छायाचित्रे, व्हिडिओ दिल्यास लाखो रुपये देतो, असे सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.