‘निर्वासितांसाठी भारत धर्मशाळा नव्हे’, श्रीलंकेच्या नागरिकाबाबत सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, प्रकरण काय.

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत म्हटले की, भारत हा जगभरातील निर्वासितांना आश्रय देणारी धर्मशाळा नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, कलम २१ चे उल्लंघन झालेले नाही, कारण अटकेची कारवाई कायद्यानुसारच झाली आहे. तसंच, भारतात स्थायिक होण्याचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांसाठीच आहे, असंही न्यायालयाने नमूद केलं.‘अटक कायद्यानुसार झाली असल्याने कलम २१चे उल्लंघन झालेले नाही. भारतात स्थायिक होण्याचा मूलभूत अधिकार कलम १९अंतर्गत केवळ भारतीय नागरिकांसाठीच मर्यादित आहे’, असे न्यायमूर्ती दत्ता यांनी याचिका फेटाळताना नमूद केले.तुरुंगवास भोगल्यानंतर हद्दपारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. भारत जगभरातून आलेल्या निर्वासितांना आश्रय देऊ शकेल, अशी धर्मशाळा नाही, अशी टिप्पणी यावेळेस न्यायालयाने केली.‘जगभरातून आलेल्या निर्वासितांना भारताने आश्रय द्यायचा का? आम्ही आधीच १४० कोटी लोकसंख्येसह संघर्ष करत आहोत. ही धर्मशाळा नाही, जिथे आम्ही विदेशी नागरिकांचा विचार करू शकतो’, असे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

पीठ ने कहा, ‘‘क्या भारत दुनिया भर से आए शरणार्थियों की मेजबानी करेगा? हम 140 करोड़ लोगों को लेकर जूझ रहे हैं… यह कोई धर्मशाला नहीं है, जहां हम दुनिया भर से आए विदेशी नागरिकों का स्वागत कर सकते हैं।’’श्रीलंकेच्या तमिळ नागरिकाने ही याचिका केली होती. आपल्या देशात परत गेल्यास जिवाला धोका असल्याचे सांगून त्याने हद्दपारीपासून संरक्षण मागितले होते. तथापि, खंडपीठाने हा मुद्दा मान्य केला नाही. ‘अन्य देशात जा’, असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत दोषी ठरलेल्या याचिकाकर्त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर देश सोडावा, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिले होते. याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ‘श्रीलंकेच्या नागरिकाला शिक्षेनंतर कोणतीही निर्वासन प्रक्रिया सुरू न करता जवळपास तीन वर्षे ताब्यात ठेवण्यात आले होते.

तो व्हिसावर भारतात आला होता. त्याला श्रीलंकेत परत पाठवल्यास त्याच्या जिवाला गंभीर धोका आहे’, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला. परंतु, ‘येथे वास्तव्य करण्याचा तुमचा अधिकार काय आहे’, असा प्रश्न खंडपीठाने विचारला. यावर, ‘याचिकाकर्ता निर्वासित आहे. त्याची पत्नी, मुले आधीच भारतात स्थायिक झाली आहेत’, असे उत्तर वकिलांनी दिले.‘अटक कायद्यानुसार झाली असल्याने कलम २१चे उल्लंघन झालेले नाही. भारतात स्थायिक होण्याचा मूलभूत अधिकार कलम १९अंतर्गत केवळ भारतीय नागरिकांसाठीच मर्यादित आहे,’ असे न्या. दीपांकर दत्ता यांनी याचिका फेटाळताना नमूद केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.