दादांनी गुलाल उधळलाच! भाजप, शिंदे शिवसेनेला झटका देत 21 जागांवर विजय, संपूर्ण पॅनलला घवघवीत यश.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या जय भवानी माता’ पॅनलने विजय मिळवला. मतमोजणीत या पॅनलचे उमेदवार पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. एकूण 22681 मतदारांपैकी 16 हजारांहून अधिक मतदारांनी मतदान केले. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीला सभासदांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले. माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांच्या आवाहनाला मतदारांनी नाकारले.छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून अजित पवारांच्या जय भवानी माता’ पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर राहिले. एकूण मतदानाचा कल लक्षात घेता. संपूर्ण पॅनल विजयी झाला आहे. रात्री उशिरापर्यंत ही मतमोजणी चालू होती.जिल्हा निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. छत्रपती कारखान्याच्या 22681 मतदारांपैकी 16 हजार हून अधिक मतदारांनी मतदान केले.

तब्बल 75 टक्के मतदारांनी मतदान केल्याने मतदारांचा उत्साह दिसून आला. या मतमोजणीत पहिल्या टप्प्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखालील  जय भवानी माता पॅनलने आघाडी घेतली. जय भवानी माता पॅनलच्या वतीने पुढील सलग पाच वर्ष अध्यक्ष म्हणून पृथ्वीराज जाचक यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्यांचा पहिलाच मतदार संघाचा गट होता या गटात जाचक यांनी मोठी आघाडी घेतली आणि त्यानंतर तोच ट्रेंड दिवसभर कायम राहिला.साधारणपणे प्रत्येक मतदाराला दहा मतपत्रिका होत्या. त्यामुळे एकूण मतमोजणीत तब्बल 1 लाख 60 हजार मते मोजायची होती. त्यामुळे मतमोजणी संथ गतीने सुरू होती.

मतमोजणीचा कल लक्षात घेता छत्रपती सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी सर्वोच्च प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीला दिल्याचे दिसून आले. हे करताना कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर व भाजपचे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजीराव थोरात यांनी केलेले मतदानाचे आवाहन मतदारांनी साफ नाकारले.अजित पवार व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची युती झाल्यामुळे निवडणूक एकतर्फी होईल असे चित्र निर्माण झाले होते. छत्रपती वाचविण्यासाठी निवडणूक महत्वाची असल्यामुळे सभासदांनी पवार -जाचक यांच्या युतीच्या पॅनेलवरती विश्‍वास ठेवून  जय भवानीमाता पॅनेलकडे एकहाती सत्ता दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.