सिंहगडावर गेल्यानंतर छातीत वेदना होऊन कोसळले; पुण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ.

पुण्यात एक दुःखद घटना घडली. सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेले निवृत्त पोलीस अधिकारी राजकुमार गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. गायकवाड आपल्या मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते.पुणे: शहरातील किल्ले सिंहगड इथं फिरायला गेलेल्या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राजकुमार गायकवाड (वय 62) असं मृत्यू झालेल्या निवृत्त पोलिसाचे नाव असून या घटनेनं पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे पुण्यातील रहिवासी असलेले आणि सध्या मार्केट यार्ड इथं वास्तव्यास असलेले राजकुमार गायकवाड हे सिंहगड किल्ल्यावर आपल्या सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते.

सिंहगड किल्ला चढताना अचानक त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. ही बाब त्यांच्या मित्रांच्या ही लक्षात आली. त्यांच्यासोबत एक डॉक्टर मित्रही होता. त्यामुळे सदर डॉक्टर मित्राने सुरुवातीला राजकुमार गायकवाड यांच्यावर तिथेच प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर त्यांना जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच गायकवाड यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. ट्रेकिंगला आपल्यासोबत आलेल्या मित्राचे निधन झाल्याचे कळताच गायकवाड यांच्या इतर सहकाऱ्यांना धक्का बसला.

राजकुमार गायकवाड हे मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी पुण्यातील अनेक पोलीस ठण्यात कामगिरी बजावली होती. स्वारगेट पोलीस ठाण्यात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तसेच त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी देखील काम केले होते. गायकवाड यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणी हवेली पोलिसांनी पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. गायकवाड यांच्या निधनाने एका हरहुन्नरी व्यक्तिमत्व गेल्याची भावना त्यांच्या मित्र परिवाराकडून व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.