कारखान्याच्या मतदानावेळी पवार-पाटील समोरासमोर; दादा म्हणाले, पाटील साहेब लक्ष असू द्या, हर्षवर्धन पाटलांकडून कडक रिप्लाय.

 इंदापूरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आले. अजित पवारांनी मतदारांना, कारखाना व्यवस्थित चालवण्याची धमक असणाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी या निवडणुकीला आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच, वळवाच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य करत, प्रशासनाला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीच्या मतदानावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्र आलेले दिसले. त्यावेळी दादांनी त्यांच्या खास शैलीत पाटलांना नमस्ते केले. यावेळी दादांन बोलताना, ज्यांच्यामध्ये कारखाना व्यवस्थित चालवायची धमक आहे त्यांनाच मतदान करावं, असं म्हटलं आहे.

एकतर्फी निवडणूक नव्हती, कुठलीही निवडणूक म्हटलं की आम्ही ती तुल्यबळ आहे अशी समजूनच निवडणुकीत लक्ष घालतो.
माझा झंजावाती दौरा नव्हता, शेवटचे दोन दिवस मी प्रचार सभा घेतल्या. मी सभासद आहे, माझे वडील, माझे आजोबा सभासद होते. आमच्या परिवाराचे अनेक जण सभासद आहेत. राजकीय दृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिक दृष्ट्या आमच्या 53 गावातल्या इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दृष्टीने हा साखर कारखाना फार महत्त्वाचा असल्याचं अजित पवार म्हणाले. यावेळी वळवाच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाबाब दादांनी भाष्य केले.हवामान खात्याने पुढील काळात पावसाचा अंदाज वर्तवला होता, 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट सांगितला होता. तसं वातावरण आपल्याकडे झालेला आहे. कोणाची तीव्रता जास्त होती ती कमी झाली आहे.

उन्हाळी पिकांचं नुकसान झालं आहे पण उसाला फायदा झाला. केळीच्या बागा वगैरे याचं नुकसान झालं. पुण्याच्या विभागीय आयुक्तांना कालच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिन्या सांगितल्या. नुकसान भरपाई देण्यासाठी सूचना केल्या असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.दरम्यान, संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकाबाबत बोलताना, मी त्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही, मी पुस्तक वाचलेलं नाही.मला नरकाचे माहित नाही स्वर्गाचे असेल तर मी सांगेल, असं दादा म्हणाले. या मतदानावेळी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील समोरासमोर आले. त्यावेळी दादा, नमस्ते पाटील साहेब, लक्ष असूद्या आमच्यावर असं म्हणाले तेव्हा सगळे हसायला लागले. याच्यावर हर्षवर्धन पाटलांनी, चांगलं ठेवलंय की असं म्हणताच हस्याचे कारंजे उडाल्याचं पाहायला मिळालं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.