लग्नसोहळ्यावरुन परततांना भीषण अपघात; नवरदेवाच्या सख्ख्या भावासह तिघांचा मृत्यू, पाच जखमी.

पोखरी शिवारात शुक्रवारी मालवाहतूक टेम्पो (छोटा हत्ती) व अर्टिगा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील नवरदेवाच्या सख्ख्या भावासह तीन जणांचा मृत्यू झाला.नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात व निफाडमधील जळगाव फाट्यावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत निफाड तालुक्यातील पाच जण ठार झाले. मृतांमध्ये तीन वर्षीय बालकासह नवरदेवाच्या सख्ख्या भावाचा समावेश आहे.पोखरी शिवारात शुक्रवारी मालवाहतूक टेम्पो (छोटा हत्ती) व अर्टिगा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील नवरदेवाच्या सख्ख्या भावासह तीन जणांचा मृत्यू झाला. तिघेही जळगाव (ता. निफाड) येथील रहिवासी आहेत, तर पाच जण जखमी झाले. यापैकी कारचालक वैभव वाल्मीक वेताळ याच्यासह दोन जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते. मृतांमध्ये नवरदेवाचा भाऊ नीलेश कराडसह तुषार कराड, बोकडदरे येथील अक्षय सोनवणे यांचा समावेश आहे.

जळगावचे शरद कराड यांचा मोठा मुलगा सूरज याचा शुक्रवारी दुपारी कासारी (ता. नांदगाव) येथे विवाह होता. विवाह आटोपल्यानंतर नवरदेवाचा लहान भाऊ नीलेशसह सात-आठ तरुण शुक्रवारी सायंकाळी अर्टिगा कारने निफाडकडे परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. यात तुषार कराडचा जागीच मृत्यू झाला, तर नीलेश कराड व अक्षय सोनवणे यांचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुषार कराड सिव्हिल इंजिनीअर, तर नीलेश इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होता. अक्षय सोनवणे निफाड येथील एका कांदा व्यापाऱ्याकडे दुकानाचे काम पाहत होता. तो मामाकडेच जळगाव येथे राहत होता.तिघेही तरुण कुटुंबातील कमावते होते. तिघेही अविवाहित होते. मोठ्या भावाच्या विवाहाला काही तास उलटत नाही तोच लहान भावाच्या मृत्यूने कराड कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नीलेश व तुषार यांच्यावर जळगावात, तर अक्षय सोनवणे याच्यावर बोकडदरे या त्याच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

तीन तरुणांच्या निधनाने जळगाव येथील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. निफाड येथील तिरंगा रॅलीही रद्द करण्यात आली होती.नाशिककडून निफाडकडे येणाऱ्या मोटारसायकलला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने मोटरसायकलवर मागे बसलेल्या मातेसह तीन वर्षांच्या बालकाचा शनिवारी करुण मृत्यू झाला. नाशिकहून हिरो होंडा मोटारसायकलने (एमएच १५/एचएल ०२४७) शिवडी (ता. निफाड) येथील अनिल विश्वनाथ आहेर हे पत्नी ज्योती आणि तीन वर्षीय बालक वेदांशसह शिवडीकडे येत होते. त्याच वेळी निफाडमधील जळगाव फाट्यावर रात्री आठला मागून येणाऱ्या कंटेनरने (क्र. एमएच २० जीझेड २३३४) मोटारसायकलला मागून धडक दिल्याने मागे बसलेले ज्योती आणि वेदांश यांचा जागीच मृत्यू झाला. निफाड पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.