परभणीमध्ये दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानं एका अल्पवयीन मुलीनं नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचं बोललं गेलं. मात्र, सत्य वेगळंच समोर आलं आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून तिने विष प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परभणीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं होतं. नैराश्यातून तिने टोकाचं पाऊल उचललं असं सर्वांना वाटलं होतं. मात्र आता वेगळेच सत्य समोर आले आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घ्या. संबंधितयुवती शाळेत जाताना आणि येताना रस्त्यामध्ये थांबून आरोपी हा सतत तिची छेड काढायचा. आरोपी सतत म्हणायचा की तू माझ्याशी बोल मी तुला आवडत नाही का असे म्हणायचा.
सततच्या त्रासाला सतरा वर्षीय तरुणी कंटाळली आणि तिने घरामध्ये धान्यामध्ये टाकण्याचे विषारी द्रव्य प्राशन केले. युवतीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदरील प्रकरणी तरुणीस आत्महत्येस प्रवर्त केल्याप्रकरणी आरोपी तोरणावर 16 मे रोजी पिंपळदरी पोलीस ठाण्यात विनयभंग पॉस्को आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणी आरोपीचे नाव राजीव बापूराव येवले असे आहे.याविषयी विस्तृत माहिती अशी की, आरोपी राजू बापूराव येवले हा या तरुणीस सतत त्रास देत होता. ती गावातून शाळेत जात असताना ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर थांबायचा. शाळेतून येता जाता तिची छेड काढायचा. तू माझ्याशी बोल, तुला मी आवडत नाही का असे म्हणून तिची छेड काढायचा. सततच्या त्रासाला ही तरुणी कंटाळली. घरी असताना 14 मे रोजी दुपारी दोन च्या दरम्यान तरुणीने धान्य टाकण्याचे विषारी द्रव्य प्राशन केले.









