सोलापुरात मोठी दुर्घटना; MIDCतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, ३ कामगारांचा होरपळून मृत्यू.

सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.सोलापूर: सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान लागलेल्या या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आणखी चार ते पाच कामगार अडकल्याचे समजते. संबंधित टेक्स्टाईलचा मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास टॉवेल कारखान्यात धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर एमआयडीसी परिसरात मोठा गोंधळ उडाला. परिसरातील काही लोकांनी 108 या क्रमांकावर फोन करत दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून शासकीय रुग्णवाहिका रवाना झाल्या. एमआयडीसीतील कारखान्यात लागलेल्या आगीची माहिती मिळताच पहाटेपासून या भागामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, अग्निशामक दल यांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीनंतर कारखान्यात अडकलेल्या अनेक कामगारांना बाहेर काढण्यात आले असून यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. मयतांची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, आठ ते दहा गाड्यांच्या साहाय्याने पाणी मारून झाले तरीही अजून आग आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. या दुर्घटनेत जीवितहानीसह टॉवेल कारखाना पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.