हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने दोन गटांत हाणामारी !

अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यावरून दोन गटांत लोखंडी पाईप, लाठ्याकाठ्या, लाकडी फळ्यांनी हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे कि, भरत सुभाष पाटील याने फिर्याद दिली की, दि. १५ मे रोजी आनोरे गावात हळदीच्या कार्यक्रमात नाचताना दिनेश सुनील पाटील याचा पुतण्याला धक्का लागला.

त्यावरून वाद झाले. त्यानंतर घरी गेल्यावर दिनेश सुनील पाटील हा हातात चाकू, भरत सुनील पाटील हातात लोखंडी रॉड, सुनील शिवदास पाटील हातात काठी आणि कुणाल मधुकर पाटील हा हातात लोखंडी सळई घेऊन आणि सोबत आशाबाई सुनील पाटील हे घरात घुसले. दिनेशने त्याच्या हातातील चाकूने पुतण्या निखिलवर वार केला. त्याच वेळी सुनील पाटील याने लोखंडी रॉड भरतच्या डोक्यात टाकला. पाचही जणांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटातर्फे भरत सुनील पाटील यांनी फिर्याद दिली की, हळदीच्या कार्यक्रमात वाद झाल्यावर आम्ही घरी आलो तेव्हा रात्री ११:३० वाजेच्या सुमारास बँड बंद झाल्यावर सनी शरद पाटील, गुड्डू भरत पाटील, भरत सुभाष पाटील आणि शरद सुभाष पाटील हे घराकडे आले. गुड्डू याने काठीने आणि भरत सुभाष पाटील याने हाताने सुनील पाटील यांना मारहाण केली. दिनेशला सनी आणि शरद पाटील यांनी लाकडी काठी आणि फळीने मारहाण केली. आई आशाबाई भांडण सोडवत असताना तिलाही मारहाण केली. याबाबत चौघांविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.