विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन.

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन.  ‘कोणतीही अपेक्षा न ठेवताना जर आपण जर कोणाला मदत केली तर त्यात आपल्याला खूप आनंद होतो. आपण दुसऱ्यांच्या जीवनात काही आनंद निर्माण करू शकलो तर त्याच्यासारखे चांगले काहीच नाही. असे केले तर आपले आयुष्य हे अर्थपूर्ण बनते.’, असे जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक व अनुभूती शाळेचे अध्यक्ष अतुल जैन म्हणाले.अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल-सेकंडरी शाळेच्या १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे काय? या विषयावर अतुल जैन यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनुभूती शाळेच्या संचालिका  निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

पुढे बोलताना अतुल जैन पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांने जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टींची तयारी ठेवावी. शिस्त, सातत्य आणि त्याग यातूनच त्यांना यशस्वी होता येईल. माझे आजोबा हिरालालजी यांनी लहानपणी मला एक गोष्ट सांगितली ती म्हणजे मेणबत्तीसारखे झिजणारे आपले आयुष्य हवे ते एखाद्या फटाक्यासारखे नसावे की जो एकदा फुटला की तो संपला. असे सांगत अनुभूती स्कूलचे सर्वचे सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाल्याने त्यांनी विशेष कौतूक केले. त्यानंतर त्यांनी शैक्षणिक वाटचाली विषयी विद्यार्थ्यांना बोलते केले. आपली आवड, अभ्यास व पुढील करिअर निवडीविषयी मनोगत व्यक्त केले. करिअर निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

बऱ्याच विद्यार्थ्यांनी ११ वी व १२वी सायन्स शाखेत प्रवेश घेऊन इंजिनियरींग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर अतुल जैन यांनी सांगितले की, इंजिनियरिंगकडे जायचे असेल विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यापेक्षा सरळ पॉलिटेक्नीकला डिप्लोमा प्रवेश घेतला तर इंजिनियरींग ड्रॉइंग व गणित विषयाचा पाया भक्कम होईल यासह एक वर्ष वाचेल. दुसरे कारण असे की इंजिनियरींग डिप्लोमा केल्यास लगेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.फोटो कॅप्शन  (_TRH4552) – अनुभूती स्कूलच्या यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्यासह अनुभूती सेकंडरी स्कूलचे शिक्षकवृंद.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.