रा.कॉ.युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची डॉ. संभाजीराजे पाटील यांच्याकडे सदिच्छा भेट.!दि.१७ मे रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.सुरज चव्हाण यांचा भुसावळ येथील नियोजित दौरा दरम्यान पारोळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. संभाजीराजे आर पाटील यांच्या कडे सदिच्छा भेट दिली.
यावेळी मा.सुरजजी चव्हाण यांचा शाल व बुके देत स्वागत सत्कार करण्यात आला.यानंतर पक्षाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी युवक प्रदेशउपाध्यक्ष सारंग भावसार,युवक प्रदेश सरचिटणीस अमर दादा,
युवक प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख,युवक प्रदेश सरचिटणीस रणजीत नरोटे,डॉक्टर सेल जळगांव जिल्हाध्यक्ष डॉ महेश पवार उपस्थित होते.









