रावेर तालुक्यातील मोहमांडली नवी येथे जागतिक डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.प्राथमिक आरोग्य खिरोदा अंतर्गत सातपुडा पर्वतातीलअतिदुर्गम आदिवासी भागातील उपकेंद्र मोहमांडली येथे रावेर तालुका आरोग्य अधिकारी आदरणीय डॉ अमोल भंगाळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सन्माननीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपल पाटील यांच्या आदेशाने जागतिक डेंग्यू दिवस साजरा केला गेला यामध्ये डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली आणि त्यापासून बचावासाठी विविध उपाय योजना ची माहिती देण्यात आली
मोहमांडली येथील ग्रामपंचायत समोर जि प शाळेजवळ व ग्रामपंचायतीच्या आवारात जनतेला एकत्रित करून आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा व तुंबलेल्या गटारी वाहत्या करणे जुने टायर्स नारळाच्या करवट्या फुटकी भांडे ज्यात पावसाचं पाणी असेल अशा निरुपयोगी वस्तू नष्ट करावे जेणेकरून डेंग्यूचे डास उत्पन्न होणार नाही व डेंग्यूची आजाराची लागण होणार नाही खिडक्यांना जाळ्या बसवाव्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा पिण्याचे पाणी झाकून ठेवावे याबाबत ठिकठिकाणी गट सभा घेऊन जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली
व डास निर्मूलनाची शपथ घेण्यात आली डेंग्यू आजाराची चिन्हे लक्षणे याबाबत माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रावेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमोल भंगाळे डॉ रमीज सय्यद डॉ गिरीश पाटील पर्यवेक्षक संजीव सूर्यवंशी ANM वैशाली तळेले MPW मुबारक तडवी आशा वर्कर मदतनीस आदी उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी जहागीर तडवी व गावकरी उपस्थित होते









