संजय राऊतांच्या पुस्तक प्रकाशनापूर्वीच राजकारण तापलं; कार्यक्रमातून पुन्हा करणार मोठा गौप्यस्फोट?

 शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत आहे. या कार्यक्रमाआधीच राजकीय वातावरण तापले असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर टीका केली आहे.मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन आज करण्यात आलं आहे. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. मात्र प्रकाशनापूर्वीच संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. ‘संजय राऊत हे पाकिस्तान सारखे आहेत, गुन्हे करायचे आणि विक्टिम कार्ड खेळायचं ..अरे, तुम्ही काय स्वातंत्र्यसैनिक म्हणून जेलमध्ये नव्हता गेलात, तर आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेला होता,” अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी 9 नोव्हेंबर 2022 या रोजी मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच त्यावेळी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती. निमित्त होतं ते महेश केळुसकर यांच्या ‘हसरगुंडी’ आणि ‘झेंडूची झुले’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचं. 19 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार संजय राऊत आणि हास्य कवी अशोक नायगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती.या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातही संजय राऊत यांनी आर्थर रोड कारागृहात आलेले अनुभव कथन केलेले पाहायला मिळालेले होते. राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक वर्तन विसंगतीवर भाष्य करणारा हसरगुंडी हा लेख संग्रह आहे. आर्थर रोड कारागृहामध्ये आलेले अनुभव तसेच तत्कालीन राजकीय परिस्थितीवर संजय राऊत यांनी या कार्यक्रमात आसूड ओढलेला पाहायला मिळालेला होता.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच फार मोठी चर्चा होताना दिसून येत आहे. ईडीच्या कारवाईनंतर ऑर्थर रोड कारागृहात काढलेले शंभर दिवसांचे अनुभव पाहता आजच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात संजय राऊत नेमके काय बोलतात? याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.