किराणा दुकानासमोर मुलगी उभी, आरोपीने केले अपरहण, ऊसाच्या शेतात नेलं आणि…; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना.

 पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एका साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी नवनाथ रिठे याला अटक केली आहे. आरोपीने मुलीला ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिला मारहाणही केली. दौंड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. या घटनेने मोठी खळबळ उडालीये. हेच नाही तर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी नराधमाला ताब्यात देखील घेतलंय. पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी येथील नवनाथ चंद्रकांत रिठे या 27 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात दौंड पोलिसात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून दौंड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

16 मे 2025 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची साडेपाच वर्षांची मुलगी ही पुणे-सोलापूर महामार्गावरील भागवत वस्ती येथील किराणा दुकानासमोर उभी असताना आरोपीने तिचे अपहरण केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती कळताच मुलीचा शोध घेतला जात होता. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली.आरोपीने मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला दौंड तालुक्यातील मळद गावच्या परिसरातील ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. हेच नाही तर आरोपीने मुलीच्या अंगावरील कपडे काढून टाकले आणि तितक्यावर न थांबताना त्याने तिला मारहाण देखील केली. अगोदर त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला आणि मग त्या चिमुरडीला मारहाण करण्यास सुरूवात केली.आरोपीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, असल्याची माहिती मिळतंय. या घटनेबद्दल कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही वेळातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणात अधिकचा तपास हा केला जातोय. या प्रकरणी काही मोठे खुलासे होऊ शकतात का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.