भाजप आमदाराला भरमंचावर भोवळ, तानाजी मुटकुळे चक्कर येऊन पडले, कार्यकर्त्यांनी खांद्यावरुन खाली आणलं.

भाजपा आमदार तानाजी मुटकुळे हे भर रॅलीमध्ये चक्कर येऊन पडले आहेत.हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान हिंगोली विधानसभेचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना अचानक भोवळ आली आहे. तिरंगा रॅली सुरू असताना तानाजी मुटकुळे जमिनीवर कोसळले. यानंतर एकच गोंधळ उडाला. यादरम्यान कार्यकर्त्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता कार्यकर्त्यांनी आमदार मुटकुळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सध्या तानाजी मुटकुळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मात्र, या घटनेने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.तानाजी मुटकुळे यांना चक्कर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन त्यांना खाली आणले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. काही कार्यकर्त्ये त्यांना वारे घालताना देखील दिसत आहेत.

यावेळी पोलिस कर्मचारी देखील तानाजी मुटकुळे यांना खाली घेऊन जाण्यासाठी मदत करताना दिसतोय. खाली उभ्या असलेल्या गाडीमध्ये टाकून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिरंगा रॅली सुरू असतानाच ही घटना घडली. सध्या तानाजी मुटकुळे यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती येतंय.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.