मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार; उंच डेक बांधण्याची योजना, काय होणार बदल.

 मुंबईतील मस्जिद बंदर स्टेशन आता उंच होणार आहे. रेल्वे स्टेशन एक मजला एलिव्हेटेड डेकद्वारे वर नेले जाणार आहे. यासाठी रेल्वेने नऊ कोटींहून अधिक रुपये मंजूर केले आहेत. सर्व प्लॅटफॉर्मवर डेक बांधला जाईल. यामुळे प्रवाशांना गर्दीसह, छपराची समस्याही सुटणार आहे.मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर हे सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक आहे. आता या स्थानकाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मस्जिद बंदर स्टेशन आता असलेल्या ठिकाणाहून एक मजला वर केलं जाणार आहे. रेल्वेने मस्जिद बंदर स्टेशनवरील सर्व प्लॅटफॉर्म वर घेऊन एक उंच डेक बांधण्याची योजना आखली आहे. यासाठी ९.१४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.रेल्वेने मस्जिद बंदर स्टेशनवरील सर्व प्लॅटफॉर्मवर एक उंच डेक बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. मस्जिद बंदर स्टेशन प्रमुख व्यावसायिक ठिकाणांपैकी एक असल्याने या स्टेशवर, तसंच आजूबाजूच्या भागात आठवड्याच्या दिवसात मोठी गर्दी असते. अर्थसंकल्पानुसार, मस्जिद बंदर स्थानकात एस्केलेटर आणि लिफ्टसह एलिव्हेटेड डेक बांधण्यासाठी ९.१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मस्जिद बंदर हे सर्वात जुन्या स्थानकांपैकी एक असून ते २० सप्टेंबर १८७५ रोजी हे स्थानक सुरू करण्यात आलं होतं.

मस्जिद बंदर हे मध्य रेल्वेवरील प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक आहे. त्याशिवाय हा भाग विविध व्यवसायांसाठी मध्यस्थानी असलेलं क्षेत्र आहे. अशा सतत अतिशय गर्दी असलेल्या वर्दळीच्या ठिकाणावरुन प्रवास करताना मस्जिद बंदर स्थानकात मोठी गर्दी होताना दिसते. इतक्या मोठ्या गर्दीसाठी हे स्टेशन अतिशय अरुंद ठरतं आहे. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म अरुंद असल्याने सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. अनेकदा एकाच वेळी दोन्ही बाजूने ट्रेन आल्यास चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती दिसते. या मस्जिद बंदर पुलाला अनेक पूल जोडले गेले आहेत. मात्र तरीही स्थानकात मुख्य समस्या अरुंद छप्पर नसलेल्या प्लॅटफॉर्म्ससह, निमुळते जिने असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.रेल्वे अधिकाऱ्यांनी या स्टेशनबाबत माहिती देताना सांगितलं, की प्लॅटफॉर्म असाच ठेवून त्यावर छप्पर टाकणं अशक्य आहे.

स्थानकात छप्पर बसवलं गेलं, तर रेल्वे गाड्या चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेवर अतिक्रमण होईल आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होईल. प्लॅटफॉर्मच्या मर्यादा आणि सुरक्षा मानकांमुळे हे शक्य नाही. त्यामुळे आता संपूर्ण स्टेशन एलिव्हेटेड डेकद्वारे उंच केलं जाईल. यामुळे प्रवाशांना छताच्या समस्येसह, एक अधिक मजला तयार झाल्याने गर्दी कमी करण्यास मदत होईल.सुरुवातीला सर्व प्लॅटफॉर्म नऊ गाड्यांसाठीचे होते. मात्र त्यानंतर १२ डब्ब्यांच्या लोकल सुरू झाल्या. त्यावेळी जवळपास दहा ते बार वर्षांपूर्वी ९ प्लॅटफॉर्मच्या गाड्यांचा विस्तार झाला आणि नऊ गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवरून १२ डब्ब्यांच्या लांबीपर्यंत प्लॅटफॉर्मचाही विस्तार करण्यात आला. तेव्हापासून या मस्जिद बंदर स्थानकांत समस्या निर्माण झाली. प्लॅटफॉर्म वाढवण्यात आला, मात्र वाढवलेल्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षेच्या दृष्टीने छप्पर टाकण्यात आलं नाही. मात्र आता एलिव्हेटेड डेक केल्याने ही समस्या सुटेल अशी माहिती देण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.