पुण्यातील ISIS मॉड्युल प्रकरणी NIA ची मोठी कामगिरी, दोन वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक, कोंढव्यात…

पुण्यातील कोंढवा परिसरातील आयसिस मॉड्यूलशी संबंधित ही अटक आहे. 2022-23 या काळात आरोपींनी कोंढवा येथील भाड्याच्या घरातून आयईडी (बॉम्ब) तयार करण्याचे काम आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने आयसिसशी संबंधित पुणे मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई केली. अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांच्या मुसक्या इंडोनेशियातून आवळण्यात आल्या आहेत. दोघा जणांना भारतात आणून मुंबईत अटक करण्यात आली. लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.इंडोनेशियामधल्या जकार्तामध्ये अनेक महिन्यापासून दोन्ही आरोपी लपून बसले होते अशी माहिती एनआयएला मिळाली होती, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरातील आयसिस मॉड्यूलशी संबंधित ही अटक आहे. 2022-23 या काळात आरोपींनी कोंढवा येथील भाड्याच्या घरातून आयईडी (बॉम्ब) तयार करण्याचे काम आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.एवढेच नाही तर त्यांनी तयार केलेल्या स्फोटकांची चाचणीसुद्धा नियंत्रित स्फोटाच्या माध्यमातून केली होती.अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान हे दोघे इंडोनेशियात लपून राहत होते. एनआयएच्या विनंतीवरुन तेथून हद्दपार करण्यात आल्यानंतर त्यांना भारतात आणले गेले.

या प्रकरणात यापूर्वी पुणे पोलिसांनी कोंढवा आणि कर्वेनगर परिसरात छापे टाकले होते, जिथे दोघा आरोपींना पकडण्यात मदत झाली होती.या प्रकरणात एनआयएने आधीच इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.मोहम्मद इम्रान खान मोहम्मद युनूस साकीअब्दुल कादिर पठाण  सिमाब काझी झुल्फिकार अली बडोदावाला शमिल नाचन अकीफ नाचन शाहनवाज आलम
एनआयएच्या तपासानुसार आरोपींनी देशभरात, विशेषतः महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये आयसिसच्या विचारसरणीवर आधारित दहशतवादी हल्ल्यांचे कट रचले होते. ही अटक भारताच्या दहशतवादविरोधी लढ्यातील महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. एनआयए आता या दोघांकडून अधिक माहिती मिळवून संपूर्ण जाळ्याचा छडा लावण्याच्या प्रयत्नात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.