बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटायला गेला तो परतलाच नाही, तरुणाचा करुण अंत, कुटुंबाचा एकच टाहो.

बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटून घरी परतणाऱ्या भावावर नियती कोपली आणि एका अपघातात त्याला त्याचा जीव गमवावा लागला आहे. या घटनेने लगीनघरात एकच शोककळा पसरली आहे.अकोला शहरात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र, हा पूल वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पूल तयार झाला तेव्हापासून या पुलावर अनेक अपघात झाले, यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. तर गुरुवारी पुन्हा एक अपघात या पुलावर झाला आणि एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिवम जानराव आगळे असं अपघातात मृत्यू झालेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. शिवम त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी जात होता.अकोला शहरातील उड्डाणपुलावर गुरुवारीच्या उशिरा रात्री एका कारची जोरदार धडक लागल्याने दुचाकी डिव्हायडरवर आदळून अपघात झाला.

या अपघातात दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणजोत मालवली, शिवम जानराव आगळे हा 24 वर्षाचा युवक अकोला शहरातील गुरुकुल कोठारी वाटिका 1 येथील रहिवासी आहे.शिवमच्या बहिणीचे लग्न 5 जूनला असल्याने तो बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका नातेवाईकांना वाटत होता. त्यानंतर तो रात्री उशिरा घरी परतत असताना उड्डाणपुलावर भरधाव चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. जोरदार धडकेमुळे दुचाकी पुलावरील डिव्हायडरवर जाऊन आदळली. त्यात शिवम हा रस्त्यावर पडला त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

विशेष म्हणजे ज्या वाहनाने शिवमच्या दुचाकीला धडक दिली. त्या वाहनाने आणखी वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.अकोला शहरातील जेलचौक ते टॉवर चौकापर्यंत उड्डाणपुल हे अपघात प्रवण स्थळ झाले असल्याने भरधाव वाहनांकडून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या पुलावर हिट अँड रनचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या पुलावर वाहन चालकांची सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी अनेक दिवसांपासून रेंगाळत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष घातल्यास कॅमेऱ्याच्या भीतीपोटी अपघातात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शासन दरबारी नागरिकांची ही मागणी रेंगाळली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.