दारु पिऊन सासरी गेला, पत्नीशी भांडला अन् काहीच वेळात होत्याचं नव्हतं, पाहून सारे हादरले.

नांदेडमध्ये एका व्यक्तीने सासरी जाऊन आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.पत्नीसोबत सुरु असलेल्या कौटुंबिक वादातून पतीने सासुरवाडीतच गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कदायक घटना घडल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सांगवी बे तांडा येथे ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने गावात एकच हळहळ व्यक्त होतं आहे. ज्ञानेश्वर गोवर्धन चव्हाण असं मयत पतीचं नाव असल्याची माहिती आहे.मयत ज्ञानेश्वर चव्हाण हा मुखेड तालुक्यातील लाखोबा तांडा येथील रहिवासी आहे.

मागील काही दिवसांपासून त्याचा पत्नीसोबत कौटुंबिक वाद सूरु होता. ज्ञानेश्वर हा आपल्या पत्नीला नेहमी मारहाण करायचा. त्याला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. या कौटुंबिक वाद आणि सततच्या मारहाणीने कंटाळले ज्ञानेश्वर याची पत्नी माहेरी निघून गेली होती.त्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. अनेकवेळा दोघांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, दोघांमधील वाद काही केल्या मिटत नव्हता. गुरुवारी (15 मे) रात्री ८ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर हा आपल्या सासुवाडीत गेला. यावेळी त्याने खूप गारु प्यायली होती. दारूच्या नशेत त्याने पत्नीसोबत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने सासुरवाडीतच गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मुखेड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक मंचकराव फड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि ज्ञानेश्वरचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत ज्ञानेश्वर चव्हाण याच्या पश्चात आई वडील, भाऊ, बहीण, पत्नी आणि तीन मुलं असा परिवार असल्याची माहिती आहे. कौटुंबिक वादातून जावयाने सासुरवाडीत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेने गावात एकच शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.