मुंबई इंडियन्सला मिळाली सर्वात मोठी आनंदाची बातमी, कोणता मॅचविनर खेळाडू आता संघात परतणार आहे, जाणून घ्या… मुंबई इंडियन्सला मिळाली सर्वात मोठी आनंदाची बातमी, कोणता मॅचविनर खेळाडू आता संघात परतणार आहे, जाणून घ्या…

मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता एक गुड न्यूज आली आहे. कारण मुंबईच्या संघात आता एका स्टार खेळाडूची एंट्री होणार आहे, हा स्टार खेळाडू आहे तरी कोण, जाणून घ्या..मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाी जो खेळाडू सर्वात लाडका ठरला होता, त्याची आता संघात दमदार एंट्री होणार आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याची आगामी दोन सामन्यांसाठीची चिंता मिटणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आता आयपीएलसाठी भारतामध्ये येण्यास नकार दिला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघातील आता रिली रिक्लेटन आणि कॉर्बिन बॉश पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी भारतात येणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसला होता. परेदशी खेळाडू पुन्हा आयपीएल खेळण्यासाठी भारतात येणार नाही, असे वाटत असताना मुंबईच्या संघाला मात्र गुड न्यूज मिळाली आहे. कारण मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू आता पुन्हा एकदा संघात परतणार आहे.मुंबई इंडियन्सला यंदाच्या मोसनात काही स्टार खेळाडू भेटले.

कारण आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने चलाखीने गेम केला आणि गुणवान खेळाडूंना आपल्या ताफ्यात स्थान दिले. त्याचा परीणान यंदाच्या आयपीएलमध्येही पाहायला मिळाला. हार्दिक पंड्याने ज्या खेळाडूचे सर्वांसमोर कौतुक केले होते, तो खेळाडू आता पुन्हा एकदा मुंबईच्या संघात दाखल होणार आहे. मुंबईच्या संघाकडून यावेळी खेळताना ज्याने दमदार अष्टपैलू कामगिरी केली होती आणि पुरस्कारही मिळवले होते, असा इंग्लंडचा विल जॅक्स आता मुंबईच्या संघात पुन्हा दाखल होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या संघाने विल जॅक्सशी संपर्क साधला होता. त्यावेळी विल जॅक्सने उर्वरीत दोन सामने खेळण्यासाठी आपण मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल होणार, असे म्हटले आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या उर्वरीत दोन लीगच्या सामन्यांमध्ये विल जॅक्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. विल जॅक्स हा एक धडाकेबाज फलंदाज आहे, ज्याची फलंदाजी यावेळी सर्वांनीच अनुभवली आहे.

त्याचबरोबर विल जॅक्स हा चांगली फिरकी गोलंदाजीही करतो. त्यामुळे कर्ण शर्माबरोबर त्याला गोलंदाजीला उतरले गेले होते आणि विल जॅक्सने विकेट्स मिळवत मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाचा वाटाही उचलला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा तो लाडका खेळाडू ठरला होता. त्यामुळेच प्रत्येक सामन्यात त्याला संधी मिळत होती. या संधीचे सोनेही त्याने केले होते.विल जॅक्सने मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. तो आता मुंबईच्या संघात पुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचे जे दोन लीग सामने होणार आहेत, त्यामधअये विल जॅक्स हा कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. यापूर्वी इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोवला मुंबईचा संघ आपल्या ताफ्यात घेणार असल्याचेही समोर आले होते. त्यानंतर ही दुसरी गुड न्यूज मुंबईच्या संघाला मिळाली असल्याचे आता समोर आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.