बालवाङ्मय वाचायचं माझं वय नाही! राऊतांच्या पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला.

​​खासदार राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे आज, शनिवारी प्रकाशन होणार आहे. यातील अनेक बाबींवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.मी कथा, कादंबऱ्या वाचणे कधीच सोडले आहे. कथा, कादंबऱ्या, बालवाङ्मय वाचायचे माझे वय राहिलेले नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांचे सोडून द्या तुम्ही ! ते कोण आहेत, ते खूप मोठे नेते आहेत काय, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.खासदार राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे आज, शनिवारी प्रकाशन होणार आहे. यातील अनेक बाबींवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यातच भाजपच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने शुक्रवारी फडणवीस बुलढाण्याला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. राऊत यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने प्रश्न विचारताच त्यांनी कथा, कादंबऱ्या वाचणे सोडल्याचा दावा केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीची भूमिकाही स्पष्ट केली. महायुती एकत्र लढणार आहेच. पण, अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेत वेगळे लढावे लागले तरी महायुतीत सामंजस्य असेल, असेही ते म्हणाले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढल्या जातील. अपवादात्मक स्थितीत वेगळे लढलो तरी आमच्यात सामंजस्य राहील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महायुती एकत्र लढणार आहेच. पण, अपवादात्मक परिस्थितीत वेगवेगळे लढलो तरी सामंजस्याने वेगळे लढू. एखाद्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेत वेगळे लढावे लागले तरी महायुतीत सामंजस्य असेल, असेही ते म्हणाले.राज्यभरात महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुका स्वबळावर लढल्या जाणार की युती, आघाडी या माध्यमातून याकडे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.