पवार, ठाकरेंकडून मोदी-शहांना मदत; संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक दावा, आज प्रकाशन सोहळा.

 ‘मी पुस्तकात लिहिलेल्या दोन्ही घटना सत्य आहेत. मी त्यापेक्षाही जास्त लिहू शकलो असतो, पण त्याने फार हाहा:कार माजला असता. मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्याने मी मर्यादा पाळल्या,’ असेही राऊत म्हणाले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा या दोघांना मदत केली, मात्र त्यांनी उपकाराची जाणीव न ठेवता बाळासाहेबांचाच पक्ष फोडला,’ असा दावा शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला.खासदार संजय राऊत यांनी त्यांची ईडी कोठडी आणि तुरुंगातील दिवस यांवर आधारीत ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले असून त्यात हे दावे केले आहेत. या पुस्तकाचे आज, शनिवारी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांशी संवाद साधाताना राऊत बोलत होते.

‘मी पुस्तकात लिहिलेल्या दोन्ही घटना सत्य आहेत. मी त्यापेक्षाही जास्त लिहू शकलो असतो, पण त्याने फार हाहा:कार माजला असता. मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्याने मी मर्यादा पाळल्या,’ असेही राऊत म्हणाले. ‘मोदी यांनी शहा यांच्यासंदर्भात शरद पवार यांच्याशी वारंवार चर्चा केली, विनंती केली, हे मला माहीत आहे. तेव्हा अमित शहा फार कुणाला माहीत नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार यांनी, ‘हा कोण माणूस आहे, ज्याच्यासाठी तुम्ही मला वारंवार फोन करीत आहात?’ असेही मोदी यांना विचारले होते. त्यावर ‘हा माणूस माझ्यासाठी फार कामाचा आहे,’ असे मोदींनी पवार यांना सांगितले होते, असा दावा राऊत यांनी केला.

 शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी छेडले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी कथा, कादंबऱ्या वाचणे कधीच सोडले आहे. कथा, कादंबऱ्या, बालवाङ्‌मय वाचायचे माझे वय राहिलेले नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांचे सोडून द्या तुम्ही! ते कोण आहेत, ते खूप मोठे नेते आहेत का, असा टोलाही त्यांनी लगावला. तर ‘संजय राऊत कसा माणूस आहे सर्वांना माहीत आहे. त्यांनी पुस्तकात काय लिहिले त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही,’ असे प्रत्युत्तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.