पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीला संपवलं, बालमित्रानेच काटा काढला, ४८ तासात घटनेचा उलगडा, काय घडलं.

२७ वर्षीय तरुणीची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी अरोपीने तीच्या तोंडात एलपीजी पाईप टाकून तीला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.गुरुवारी १५ मे रोजी २७ वर्षीय तरुणीची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी अरोपीने तीच्या तोंडात एलपीजी पाईप टाकून तीला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आणि तरुणी एकमेकांना बालपणापासून ओळखत होते.पाटणा येथे भाड्याच्या घरात रहात असलेल्या २७ वर्षीय संजना सिंह या तरुणीचा गळा चिरलेला मृतदेह आढळल्याची माहिती बिहार पोलिसांनी शुक्रवारी दिली. संजनाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत होता.

तिच्यावर कात्रीने वार करून तिची हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी तीच्या तोंडात एलपीजी पाईप टाकून तीला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत संजना सिंह मुझफ्फरपूर जिल्ह्यातील रहिवासी होती आणि आरोपी तिला ओळखत होता. पाटणा सेंट्रलच्या एसपी स्वीटी सहरावत यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘गुरुवारी संध्याकाळी आम्हाला माहिती मिळाली की श्री कृष्णपुरी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये एका महिलेचा मृतदेह पडला आहे’. पोलिसांना संजनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. तीच्या शरीराचा वरचा भाग जळाला होता. तिच्या शेजारी एलपीजी सिलेंडरही पडला होता.पोलिसांनी अपार्टमेंट ब्लॉकमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना आढळले की सूरज कुमार नावाचा एक माणूस शेवटचा तिच्या घरी आला होता.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सूरज कुमारला ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीदरम्यान, सूरजने कबूल केले की त्यानेच संजनाची हत्या केली आणि पुरावे लपवण्यासाठी त्याने तिच्या मृतदेहाच्या तोंडात एलपीजी पाईप टाकून तीला पेटवून दिली होती.’सहरावत म्हणाल्या की, आरोपीने पोलिसांना सांगितले की तो संजनाला लहानपणापासून ओळखतो आणि ते वारंवार भेटत असत. परंतु काही कारणावरून झालेल्या भांडणानंतर त्याने कात्रीने तिचा गळा कापला. त्याने एलपीजी सिलेंडरने तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पळून गेला, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे एसपींनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.