दरवाजात लटकून धोकादायक प्रवास, लोकल फेऱ्या वाढवण्याच्या मागणीकडे १३ वर्षांपासून दुर्लक्षच; गर्दी विभागण्यासाठी अधिकाऱ्यांचा सल्ला.

कल्याण रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे चार लाख प्रवासी प्रवास करत असल्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. मागील १३ वर्षात लोकल फेऱ्या वाढवण्याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे.मध्य रेल्वेचे प्रवेशद्वार आणि महत्त्वाचे जंक्शन असलेल्या कल्याण रेल्वे स्थानकातून दररोज चार लाख प्रवासी प्रवास करतात. दिवसागणिक वाढणाऱ्या प्रवाशांमुळे सर्वच लोकल खचाखच भरून धावत असल्याने, दरवाजात लटकून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येते. गर्दीमुळे लोकलमधून पडून प्रवाशांना हकनाक जीवाला मुकावे लागते. यामुळे लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी असताना, मागील १३ वर्षांत याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

मध्य रेल्वेचे कल्याण स्थानक हे अत्यंत वर्दळीचे स्थानक आहे. येथून दररोज मुंबईच्या दिशेने २०५ फेऱ्या धावतात आणि तितक्याच लोकल मुंबईकडून कल्याणच्या दिशेने येतात. या लोकलमधून दररोज तीन लाख ७६ हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्या पाहता, लोकलची संख्या अतिशय अपुरी असल्याने प्रवाशाचे हाल होतात. मध्य रेल्वेवर वर्षभरात जवळपास ७०० ते ८०० प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. मात्र रेल्वेकडून लोकल वाढविणे शक्य नसल्याचे उत्तर दिले जात आहे.मध्य रेल्वेवर २०१२-१३ मध्ये १५ डब्यांच्या लोकल धावू लागल्या. त्यावेळी लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या असल्या, तरी मागील १३ ते १४ वर्षांत एकही लोकल नव्याने वाढविण्यात आलेली नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

रेल्वेकडून मध्य रेल्वेवर धावणाऱ्या लोकलपैकी नऊ गाड्या १५ डब्यांच्या आहेत. या मार्गावर दिवसभरात ८० वातानुकूलित फेऱ्या धावतात. रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यास, यावर उपाय करणे शक्य आहे. मात्र तिसरी व चौथी मार्गिका भूसंपादनामुळे रखडली आहे. प्रवाशांकडूनच रेल्वेला जागा देण्यास विरोध होत असेल, तर रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण कसे करणार, असा प्रश्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.‘सध्या लोकल फेऱ्या वाढविण्याचे कोणतेही नियोजन नाही. वाढत्या गर्दीवर पर्याय म्हणून कार्यालयीन वेळा काही प्रमाणात बदलल्या जाव्यात, त्यामुळे गर्दी विभागली जाईल,’ असे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.