कोल्हापुरात एमबीए तरुणाचं टोकाचं पाऊल, चार पानी चिठ्ठी लिहून आयुष्याची अखेर; कारण हैराण करणारं.

कोल्हापुरात एका २३ वर्षीय तरुणाने मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून चार पानी चिठ्ठी जप्त केली असून, अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, पोलीस त्याच्या मित्राकडून त्याला नेमका काय त्रास होता, याचा शोध घेत आहेत.जवळच्याच मित्राकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून कोल्हापुरातील आर.के नगर येथे राहणाऱ्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. २३ वर्षीय आकाश शांताराम बोराडे या तरुणाने राहत्या घरी फॅनला नायलॉन दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. पोलिसांना मृत तरुणाच्या खोलीतून चार पानी चिठ्ठी देखील सापडली असून करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी मित्र त्याला नेमका कशाचा त्रास देत होता, याचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शांताराम बोराडे (वय २३, रा. आर. के. नगर, कोल्हापूर, मूळ कातराबाद, ता. परांडा, जि. धाराशिव) हा आपल्या आई-वडिलांसह आर.के नगर सोसायटीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून भाड्याने राहत होता. तो कोल्हापुरातील के.आय.टी कॉलेजमध्ये एमबीएचं शिक्षण घेत होता. त्याने नुकतीच अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. त्याचं कॅम्पस इंटरव्यूमधून एका मॉलमध्ये व्यवस्थापक म्हणून सिलेक्शन देखील झालं होतं.आकाश मनमिळाऊ आणि हुशार स्वभावाचा असल्याने त्याची सर्वांसोबत चांगली वागणूक होती. मात्र गेल्या काही दिवसात तो तणावाखाली होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याला कारण विचारल्यानंतर त्याने मित्राच्या त्रासाला कंटाळलो असल्याचं सांगितलं होतं.

दिवसेंदिवस मित्राचा त्रास अधिक होत असल्याने आकाश बोराडे याने गुरुवारी रात्री राहत्या घरात बेडरूममध्ये पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.बराच वेळ आकाश बेडरूम मधून बाहेर न आल्याने आईने त्याला हाक मारली, मात्र आकाशने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आणि दरवाजा बंद असल्याने आकाशच्या आईने घर मालकाला बोलवून दरवाजा उघडला. यावेळी आकाश गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. संबंधित घटनेची माहिती त्वरित करवीर पोलिसांना कळवण्यात आली. करवीर पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.गळफास घेण्यापूर्वी आकाशने चार पानी चिट्ठी लिहून ठेवली होती, ती पोलिसांना मिळाली. शवविच्छेदनानंतर मृतदेहाचा ताबा घेऊन आई-वडील त्यांच्या मूळगावी धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आज शुक्रवारी आई-वडिलांचा जबाब घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.