लग्नाचं आमिष, नाशिक-डोंबिवलीत तीन लॉजमध्ये नेऊन अत्याचार, 25 वर्षीय विवाहितेच्या आरोपानंतर पोलिसावर गुन्हा.

सन 2020 ते 23 मे 2025 या कालावधीत संशयिताने पीडितेचा छळ करून बलात्कार केला. त्याने राणेनगर येथील कशिश लॉज, सातपूर येथील सिटाडेल, डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितेवर अत्याचार केलेप्रेमसंबंध ठेवत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेसह तिच्या पतीला मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस दलातील दंगल नियंत्रण पथकाच्या (आरसीपी) पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध इंदिरानगर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अटकेसंदर्भातील कायदेशीर कारवाई सुरू होती.इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या पंचवीस वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहर पोलिस आयुक्तालयातील दंगल नियंत्रण पथकात (आरसीपी) नेमणुकीस असलेल्या संशयित चंद्रकांत उर्फ अभी शंकर दळवी, वय 35 वर्ष, रा. केतकीनगर, म्हसरूळ, याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

सन 2020 ते 23 मे 2025 या कालावधीत संशयिताने पीडितेचा छळ करून बलात्कार केला. त्याने राणेनगर येथील कशिश लॉज, सातपूर येथील सिटाडेल, डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील लॉजमध्ये पीडितेवर अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेने 15 मे रोजी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.संशयिताने सन 2020 मध्ये पीडितेशी ओळख करून तिच्याशी कौटुंबिक संबंध निर्माण करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी नेत शारीरिक संबंध ठेवले. 15 फेब्रुवारी 2024 रोजी पीडितेने दुसऱ्या व्यक्तिसोबत विवाह करून तिचा संसार व्यवस्थित सुरू असताना संशयिताने पीडितेसह तिच्या पतीचा अपघात करून जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर पुन्हा पीडितेकडे शरीरसुखाची मागणी करून तिचा पाठलाग करीत बळजबरीने इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.दुसरीकडे, स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा खटला जलदगतीने चालविण्याची मागणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे जिल्हा न्यायालयाकडे केली आहे. या संदर्भात गुन्हे शाखेकडून जिल्हा न्यायालय प्रशासनाला अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे.स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय 37, रा. गुनाट, ता. शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, 893 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. सचदेव यांच्या न्यायालयात आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.