पिंपरी- चिंचवड परिसर हत्येच्या गुन्ह्याने पुन्हा एकदा हादरला आहे. येथे पाच जणांनी मिळून एकाची हत्या केली आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पिंपरी- चिंचवड पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरलं आहे. पिंपरी- चिंचवड परिसरातील मोशी येथील ग्रँड हॉटेलसमोर आज शनिवार (17 मे) पहाटे तीन वाजताच्या सुमारास आर्थिक वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाची धारधार शस्त्रने वार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.ज्ञानेश्वर बर्गे असं खून झालेल्या व्यक्तीचं नावं असल्याची माहिती समोर आली आहे.










