मोठा दिलासा! भटके-विमुक्तांना आता राज्यात कुठेही मिळणार रेशन; जातप्रमाणपत्र, आधारसह १५ मागण्यांवर निर्णय.

भटके-विमुक्त समाजातील विविध प्रश्नांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.राज्यातील भटके-विमुक्त समाजासाठी जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिर आयोजित केले जाईल. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशन दुकानातून धान्य उपलब्ध होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.भटके-विमुक्त समाजातील विविध प्रश्नांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. या बैठकीला भटके-विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्यासह राज्यातील भटके-विमुक्त समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘भटक्या समाजातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन १५ प्रश्न तातडीने मार्गी लावले आहेत. गतवर्षी भटक्या समाजाच्या तांड्यावर दिवाळी साजरी केली होती.

त्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला. त्यामुळे राज्यभरात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गायरान जमिनीवर भटक्या समाजाची वस्ती आहे, याचा आराखडा पंधरा दिवसांत सादर करावा. त्यांचाही प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल.’जात प्रमाणपत्र गृहभेटी आधारावर देण्यात येणार शाळा, महाविद्यालयात मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात दाखले द्यावेत. १९६१पूर्वीचे जात कागदपत्र नसणाऱ्यांना गृहचौकशी आधारे जात प्रमाणपत्र द्यावे. भटकंती करणाऱ्या व्यक्तींना नायब तहसीलदारामार्फत ओळखपत्र द्यावे .विविध दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे.१९५२चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्यावा.

आधारकार्डसाठी कागदपत्रांचा पर्याय देण्यात यावा.तात्पुरते रेशनकार्ड देण्याऐवजी कायमस्वरूपी देण्यात यावे .सरकारी किंवा खासगी जमिनीवर वसलेल्या भटक्या समाजाचे सर्वेक्षण करावे.भटक्या समाजाला रेशनकार्ड देण्यात यावे.भटक्या समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार.जागावाटपासाठी वस्तीनिहाय यादी सादर करावी. अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करून तिची बैठक घेणार भटके-विमुक्तांना कसण्यासाठी पट्टे उपलब्ध करून देणार

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.