नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या दुधाडा गावात एका युवकाची हत्या झाली. पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होता. हर्षल कोटांगले नावाच्या २५ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. गावात तणाव असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील दुधाडा गावात पैशाच्या वादातून गुरुवारी रात्री एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण बघायला मिळाले. मृत युवकाचे नाव हर्षल धनराज कोटांगले (वय २५) असून, त्याचे गावातील काही व्यक्तींशी आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११ ते १२ दरम्यान हर्षल आणि आरोपींमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाचा गेला की, आरोपींनी हर्षलवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ही घटना हर्षलच्या घरापासून अवघ्या २० मीटर अंतरावर घडली, जेव्हा तो घरी परत येत होता, त्यावेळीच हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत हर्षलला तात्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नागपूरमधील मेयो हॉस्पिटलकडे हलवण्यात आले. यादरम्यान रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.









