पेढा भरवताना मस्करी, उदयनराजेंची अतुल भोसलेंना ‘हूल’.

भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथे पेढा भरवून अतुल भोसलेंचे स्वागत केले.भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथे पेढा भरवून अतुल भोसलेंचे स्वागत केले.लौकिकाप्रमाणे ‘स्टाईल’मध्ये हूल दिली.

त्यावर अतुल भोसलेंसह उपस्थितांनाही हसू आवरलं नाही, आणि अतुल भोसले म्हणाले, ‘मला वाटलं, मला पेढा भरवताय’त्यानंतर उदयनराजे यांनी मस्करी थांबवली आणि अतुल भोसले यांना मायेने पेढा भरवला आणि त्यांचं कौतुक केलं .महिनाभर काथ्याकूट गेला महिनाभर भारतीय जनता पक्षात जिल्हाध्यक्ष निवडीबाबत तर्कवितर्क सुरु होते. सातारा जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. अखेर कराड दक्षिणचे भाजप आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या निवडीने सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात भाजपची एंट्री झाल्याचे मानले जात आहे. 2014 आणि 2019 अशा सलग दोन विधानसभा निवडणुकीत पराभवाचा झटका बसल्यानंतर तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत भाजपवासी झालेल्या डॉ. अतुल भोसले यांच्या नावापुढे आमदार हा शब्द लागला .छत्रपतींचे थेट वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या सहकार्याने सातारा जिल्हा परिषदेत स्वबळावर भाजपचे कमळ फुलवण्याची जबाबदारी अतुल भोसलेंवर आली आहेभाजप सातारा जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी या निवडीचं स्वागत करत आपल्या इच्छा आकांक्षाला मुरड घातल्याची चर्चा आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.