वचन देऊन जाळ्यात ओढलं, वारंवार शरीरसंबंध ठेवले, लग्नाआधीच तरुणीने मुलाला जन्मही दिला, पण नराधमाने मात्र….

आरोपीने तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. कालांतराने ती तरुणी गरोदर राहिली. त्या काळातही त्याने तरुणीला विश्वासात घेऊन लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे त्या तरुणीने लग्नाआधी गोंडस बाळाला जन्म देखील दिला.मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. मोठी मोठी स्वप्ने दाखवली. मुलगीही त्याच्या प्रेमात पडली. काही दिवसांनी मुलगी गरोदर राहिली. तरी देखील तो लग्नाची स्वप्न दाखवतच होता. लग्ना अगोदरच तरुणीने गोंडस बाळाला जन्म दिला. पण तो काही लग्न करण्यास तयार होत नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने थेट गंगाखेड पोलीस ठाणे गाठले आणि फसवणुक करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गोरख विश्वंभर गहिरे असे आहे.

याविषयी विस्तृत माहिती अशी की, एका 24 वर्षीय पीडित तरुणीने गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मे 2024 ते 2025 या कालावधीत आरोपीने तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. कालांतराने ती तरुणी गरोदर राहिली. त्या काळातही त्याने तरुणीला विश्वासात घेऊन लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे त्या तरुणीने लग्नाआधी गोंडस बाळाला जन्म देखील दिला. पण नंतर मात्र तो तरुण लग्नासाठी तयार होतच नव्हता. तरुणीला आपला विश्वासघात झाला हे लक्षात आले. आरोपीने खोटे आमिष दाखवत तरुणी सोबत संबंध ठेवून तीच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने थेट गंगाखेड पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपीविरुद्ध तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. 14 मे रोजी रात्री उशिरा, फसवणूक केलेल्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे हे करीत आहे. एकंदरीतच सध्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. त्यामुळे मुला मुलींचे प्रबोधन करणे काळाची गरज बनली आहे.दुसरीकडे, मुंबईतील दादर परिसरात एका उबर कॅब चालकाने आपल्या कारमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी आरोपी उबर चालक श्रेयांश पांडे याला अटक केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.