पंजाब, गुजरातला आणि लखनौला मोठा धक्का, ऐन प्लेऑफच्या शर्यतीत मॅचविनर संघाबाहेर; कोणत्या नवीन खेळाडूंची एन्ट्री.

आयपीएल 2025 हंगामातील उर्वरित 17 सामने शनिवार 17 मे पासून सुरू होणार आहेत. भारत-पाकिस्तान तणावामुळे बीसीसीआयने 9 मे रोजी ही स्पर्धा अचानक पुढे ढकलली. आता स्पर्धा पुन्हा सुरू होत आहे पण जवळजवळ प्रत्येक संघाला वेगवेगळ्या कारणांमुळे बदल करावे लागत आहेत.आयपीएल 2025 हंगामातील उर्वरित 17 सामने शनिवार 17 मे पासून सुरू होणार आहेत. भारत-पाकिस्तान तणावामुळे बीसीसीआयने 9 मे रोजी ही स्पर्धा अचानक पुढे ढकलली. आता स्पर्धा पुन्हा सुरू होत आहे पण जवळजवळ प्रत्येक संघाला वेगवेगळ्या कारणांमुळे बदल करावे लागत आहेत. काही संघाचे परदेशी खेळाडू आपल्या मायदेशी परतले तर काहींना दुखापत असल्यामुळे पुढील हंगाम खेळताना अडचणी येणार आहेत.लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे कारण त्यांचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच वेळी, पंजाब किंग्जमध्ये एका नवीन खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे.

हा खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमीसन, जो 4 वर्षांनी लीगमध्ये परतत आहे तर त्याला 2 कोटी रुपये देण्यात आले आहेत. स्पर्धा पुन्हा सुरू होण्याच्या सुमारे 48 तास आधी, गुरुवार, 15 मे रोजी आयपीएलने एका प्रेस रिलीजमध्ये ही माहिती दिली.उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मयंक यादवला पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे लखनौ आणि मयंकसाठी समस्या निर्माण झाल्या आहेत कारण गेल्या वर्षीही तो फक्त 4 सामने खेळल्यानंतर दुखापतीमुळे बाहेर पडला होता. यानंतर, चालू हंगामातही, तो लखनौच्या पहिल्या 9 सामन्यांना मुकल्यानंतर परतला आणि फक्त 2 सामने खेळू शकला.अशा परिस्थितीत, लखनौ सुपर जायंट्सने आता मयंकच्या जागी न्यूझीलंडचा युवा वेगवान गोलंदाज विल ओ’रोर्कचा समावेश केला आहे. उंच ओ’रोर्कला हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी 3 कोटी रुपये मिळतील.

आयपीएलमध्ये किवी वेगवान गोलंदाजाचा हा पहिलाच अनुभव असेल. मेगा लिलावात त्याला कोणीही खरेदी केले नाही. लिलावापूर्वी, त्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत धुमाकूळ घातला होता आणि संघाच्या ऐतिहासिक क्लीन स्वीपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.केवळ लखनौच नाही तर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सनेही बदली खेळाडूंची घोषणा केली आहे. प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला त्यांचा स्टार इंग्लिश फलंदाज जोस बटलरशिवाय पुढे जावे लागेल. बटलर सध्या परतत आहे पण लीग स्टेज सामन्यांनंतर तो उपलब्ध राहणार नाही. अशा परिस्थितीत, गुजरातने प्लेऑफसाठी श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसला करारबद्ध केले आहे. त्याला 75 लाख रुपयांना करारबद्ध करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.