‘राजा का संदेश साफ है, अमित शाहांना बाळासाहेबांनी एका फोनवर कसं वाचवलं? संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक खुलासा.

संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकात अनेक खुलासे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहांना एका फोनने मदत केली, असा दावा आहे. गुजरात दंगलीच्या वेळी अमित शहांना बाळासाहेबांनी मदत केली. बाळासाहेबांनी एका न्यायाधीशांना फोन करून अमित शहांना दिलासा देण्यास सांगितले. या मदतीनंतरही अमित शाह यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबासोबत योग्य व्यवहार केला नाही, असे राऊत म्हणतात.ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या नरकातील स्वर्ग पुस्तकामध्ये अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये जेलमध्ये असताना राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिले होते. यामध्ये राऊतांनी, बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना एका फोनने संकटातून बाहेर काढल्याची कहानी सांगितली आहे. ‘राजा का संदेश साफ है’ या प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. या प्रकरणामध्ये नेमकं काय लिहिलं आहे जाणून घ्या. यबाळासाहेब ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांना मदत केल्याची कहानी सांगण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शाहांवरती मोठे उपकार केल्याची कहानी सांगितली. गुजरात दंगलीमधील काही निघृण गुन्ह्यांचा तपास ही सीबीआयकडे होता. शाह तरूण होते त्यांची दाढी काळी होती.

फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं त्यांना सुचवलं. लहान जय शाहांना घेऊन ते मुंबईत आल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.कलानगरच्या मुख्य गेटवरच अडवून ठेवण्यात आलं. तेव्हा घामाघूम होईन बराच काळ प्रतीक्षेत होते, दुसऱ्या दिवशी शाह पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले.शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली. गुजरात दंगलीमध्ये हिंदुत्त्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दर्दभरी रोमांचक कहानी बाळासाहेबांना सांगितली. अमूक-तमूक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे अशी माहितीही बाळासाहेबांना सांगितली. मी काय करून असं बाळासाहेबांनी विचारलं, “आप बात करेंगे ते बात मान लेंगे असं शाह म्हणाले.

बाळासाहेबांनी चिरूटाचा झुरका मारला आणि धूर सोडत एक महत्त्वाचा फोन केला. अमित शाह यांचे प्रकरण ज्यांच्याकडे होते त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरून थेट बोलले. बाळासाहेबांचं वाक्य होतं, तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीपण हिंदू आहात हे विसरू नका. एका फोनमुळे अमित शाहा यांच्या राजकीय प्रवासामधील अडचणी दूर झाल्या. अमित शाहांनी काय केलं हे साऱ्या जगान पाहिलंय, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निघृणपणे वागल्याचं म्हणत राऊतांनी शाहांवर पुस्तकाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.दरम्यान, संजय राऊतांच्या या पुस्तकामध्ये ईडी चौकशी, कारवाई आणि अटक याबाबत राऊतांनी माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मदत केली हे सांगितलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.