लग्नाच्या अ‍ॅनिव्हर्सरीला नवा WhatsApp डीपी, नवऱ्याची मैत्रीण भडकली, नाशकात तरुणाचा जीव घेतला.

मृत सुरज हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवायचा. चार वर्षापासून संशयित इंदू साळवे ही त्याच्या संपर्कात होती. दि. 10 मे रोजी सुरज याने विवाहाच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्नीसोबतचा फोटो व्हॉट्सअॅपवर अपलोड केला.विवाहाच्या वर्षपूतीनिमित्त तरुणाने पत्नीसोबत ठेवलेल्या ‘व्हॉट्सअॅप डीपी’मुळे (प्रोफाइल पिक्चर) मैत्रीण भडकली. त्यामुळे तिने भावासह नातलगांच्या मदतीने संबंधित तरुणाला मारहाण करीत त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे.नाशिक तालुका पोलिसांच्या हद्दीत विल्होळीत घडलेल्या हत्येप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एका महिलेसह पुरुषाला अटक केली आहे. या दोन्ही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 13 मे रोजी सकाळी विल्होळी शिवारातील जैन मंदिराजवळील मोकळ्या जागेत सुरज काशीनाथ घोरपडे (वय 39, रा. सातपूर) याचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी सुरजच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

तपासादरम्यान शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी संशयितांचा माग काढण्याची सूचना केली. त्यानुसार अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वरमध्ये सापळा रचून संशयित इंदू विजय साळवे हिच्यासह तिचा भाऊ शशिकांत उर्फ नाना रामदास गांगुर्डे (27, संघर्षनगर, विल्होळी) या दोघांना अटक करून नाशिक तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार महेश साळुंके, मुक्तार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, नाशिक तालुका पोलिसांनी दोन्ही संशयितांना बुधवारी (दि. 14) दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित आमले यांचे पथक तपास करीत आहे.मृत सुरज हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवायचा. चार वर्षापासून संशयित इंदू साळवे ही त्याच्या संपर्कात होती. दि. 10 मे रोजी सुरज याने विवाहाच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्नीसोबतचा फोटो व्हॉट्सअॅपवर अपलोड केला. त्यानंतर इंदूने त्याला फोन करून वाद घालण्यास सुरुवात केली.दि. 11 व 12 मे रोजी सुरज हा इंदूची समजूत काढण्यासाठी विल्होळी शिवारातील तिच्या घरी पोहोचला. त्यावेळी संशयितांनी सुरजसोबत वाद घालून त्याला घरातच मारहाण केली. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.