इथली शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; परभणीत शिंदेंच्या शिवसेनेत घमासान.

परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार घमासान झाल्याचे पाहायला मिळत आहे काल नवीन जिल्हाप्रमुख म्हणून आनंद भरोसे यांची निवड पक्षाकडून करण्यात आली. भाजपने दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्वच जिल्ह्यासाठी 58 जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कामाला लागल्याचं दिसून येत आहे. महायुतीमध्ये भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, व नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यात, परभणी जिल्ह्यात शिवसेना शिंदे (Shivsena) गटात वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, येथील शिवसेना जिल्हाध्यक्षपदी (Parbhani) नवा चेहरा दिल्याने मावळते जिल्हाध्यक्ष व शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच, शिवसेनेच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड म्हणजे शिवसेना पक्ष भाजपच्या दावणीला बांधणे होय, असेच व्यंकट शिंदे यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी, आपण पक्षनेतृत्वाकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार घमासान झाल्याचे पाहायला मिळत आहे काल नवीन जिल्हाप्रमुख म्हणून आनंद भरोसे यांची निवड पक्षाकडून करण्यात आली. मात्र, या निवडीला मावळते जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांनी व त्यांच्या गटाने तीव्र विरोध केला आहे. आनंद भरोसे हे भाजपमधून विधानसभेच्या वेळेला आयात केलेले उमेदवार होते. तसेच, दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या सख्ख्या भावाला भाजपने शहराच्या अध्यक्षपदाची जबाबादीर दिली आहे. तरीही, आनंद भरोसे यांना पक्षाने जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती दिली आहे. परभणीतील एकाही पदाधिकाऱ्याला हे मान्य नसल्याचं व्यंकट शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच इथली शिवसेना ही भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय झाला असल्याचा गंभीर आरोपही व्यंकट शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. दरम्यान, या निर्णयाविरुद्ध शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींकडे आपलं म्हणणं मांडणार आहेत आणि जर पक्षाने ऐकलं नाही तर सर्वजण आपले राजीनामे देणार असल्याची माहितीही यावेळी शिंदे यांच्याकडून देण्यात आली.राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर पक्षनेतृत्वात बदल करुन सर्वच रजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र, स्थानिक स्तरावर राजकीय पक्षांच्या नेत्यांमधील मतभेद पाहता हे कितपत शक्य आहे हे लवकरच समजेल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.