जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे मोठी दुर्घटना घडली. अमळनेर स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन खाली घसरली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीचे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहेत. पण यामुळे सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. अमळनेर स्थानकाजवळ एक मालगाडी रेल्वे रुळावरुन खाली घसरली. हा अपघात इतका मोठा होता की, जवळपास मालगाडीचे पाच ते सहा डब्बे रेल्वे रुळावर अस्ताव्यस्त झालेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे घटना घडली तिथे बाजूलाच अमळनेरमधील प्रसिद्ध प्रताप महाविद्यालय आहे. ही घटना घडली तेव्हा समोरुन दुसरी रेल्वे गाडी आली असती तर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. कारण या अपघातात आजूबाजूच्या रेल्वे रुळाचंदेखील नुकसान झालं आहे.भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला मालगाडी निघाली होती.










