शेण टाकायला गेली, गावातल्या मद्यपीनं काढली तरुणीची धिंड, बेदम मारहण, अश्लील शिवीगाळ, भंडाऱ्यात धक्कादायक प्रकार.

रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज ही माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोथुर्णा गावात खळबळ उडाली आहे.गावाबाहेर असलेल्या खातकुड्यावर शेणपुंजनं फेकण्यास गेलेल्या तरुणीला गावातीलचं एका मद्यपी इसमानं गावातून तिच्या घरापर्यंत मारहाण करीत धिंड काढली. हा धक्कादायक प्रकार भंडारा तालुक्यातील कोथुर्णा गावात घडलाय. दिनेश शिवशंकर बोंद्रे (35) रा. कोथुर्णा, असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नावं आहे. या प्रकरणात वरठी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात 324, 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नेमकं घडलं काय?भंडारा तालुक्यातील कोथुर्णा गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गावाबाहेरील खातकुड्यावर शेण टाकण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय तरुणीला गावातीलच एक मद्यधुंद इसमाने अमानुष मारहाण करून गावातून तिच्या घरापर्यंत धिंड काढली.

मुलगी मारहाणीत,’ वाचवा-वाचवा’, अशी ओरडत असतांना घरी असलेली आई आणि दोन बहिणी वाचविण्यासाठी रस्त्यावर आल्या. या इसमानं या चौघींनाही अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. पीडित 20 वर्षीय तरुणीला जबर मारहाण करण्यात आल्यानं तिच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने सध्या वरठी गावात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 12 एप्रिलला रात्री घडली. गुरुवार सायंकाळी या घटनेची तक्रार दाखल करण्यात आल्यानंत रात्री पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत.. घटनानंतर कुटुंबीय मानसिक धक्क्यात असून, काल दिवसभर मीडियासमोर बोलण्यास तयार नव्हते.

रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज ही माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोथुर्णा गावात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.एका व्यसनी बापाने स्वत:च्याच गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबल्याचे समोर आले आहे. आईच्या मृत्यूनंतर अक्षरशः केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणीच बापाने मृत्यूच्या वेदना मुलीला दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली.बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक धक्कादायक  घटना समोर आली आहे.  पैठणच्या हिना नामक महिलेला माहेरी गेलेली असताना हा प्रकार लक्षात आला. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला आणि तिने मुलीची सूटका केली. बाल कल्याण समितीकडून सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.