छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा.

वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा  पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी, असा कोट्यवधींचा ऐवज लंपास केला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संतोष लड्डा यांचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे. त्याला भेटण्यासाठी लड्डा कुटुंब आठ दिवसांपूर्वी परदेशात गेले होते. लड्डा कुटुंब विदेशात असल्याचा फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. दरोडेखोरांनी घरात असलेल्या ड्रायव्हर आणि केअरटेकरच्या हातपाय बांधून त्याला बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला. केअरटेकरच्या डोक्यावर बंदूक ठेवत धमकी देत त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि मौल्यवान दागिने व चांदी चोरून नेले.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं असून त्यावरून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे वाळूज परिसरातील उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगात फिरवली आहेत. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.दरम्यान, ,वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंतापूर शिवारातील एका शेतवस्तीवर रविवारी (दि. 11) मध्यरात्री सहा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत थरार माजवला. तलवार, कोयते आणि सुऱ्यांनी सज्ज असलेल्या या टोळीने घरात घुसून महिलांच्या कानातील दागिने जबरदस्तीने ओरबाडले.

या हल्ल्यात 3 तोळे 2 ग्रॅम सोने व सुमारे 1 लाख 18 हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला. हा थरार शेतकरी योगेश रामराव इंगळे यांच्या शेतातील घरात घडला. रात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास सहा चोरटे घरात घुसले. चोरट्यांनी चेहऱ्यावर रूमाल बांधून कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश केला आणि घरातील सदस्यांना शस्त्रांचा धाक दाखवत एका खोलीत बंद केलं. तब्बल एक तास हा थरार सुरु होता. चोरट्यांनी महिलांच्या कानातील कुंडे कैचीने कापून, टॉप्स आणि इतर सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. बेडरूममधील कपाटे उघडून त्यांनी एकूण 1 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. घटनास्थळी महत्त्वाचे ठसे आणि पुरावे गोळा करण्यात आले आहेत.या प्रकरणी योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून सहा अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.