मूलबाळ होत नाही म्हणून नवस करायला गेली, आळंदीतील लॉजवर विवाहितेवर अत्याचार, दाम्पत्यासह तिघांना अटक.

महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक शोषण करण्यात आले. त्यानंतर पीडित महिलेला पुण्यात सोडून दिले. त्यानंतर पीडित महिला हिने सरळ बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठले22 वर्षीय महिला मूलबाळ होत नाही म्हणून नवस करायला गेली, मात्र याच वेळी तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काल, 14 मे रोजी उघडकीस आली.या घटनेतील तिन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी ठाणेदार दीपक वारे यांनी पोलीस चक्र फिरवत एका विशेष पथकाची नियुक्ती केली. पथकातील कॉन्स्टेबल नागसेन वानखडे, मनीष घुगे, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पातोंड यांनी अवघ्या सहा तासात तिन्ही आरोपींना अटक केली.फिर्यादी पीडित महिला हिची ओळख दोन महिन्यांपूर्वी आरोपी ज्योती नागेश हिवराळे हिच्याशी फेसबुकवरुन झाली होती. पीडित महिलेने तिला मूलबाळ होत नसल्याचं सांगितलं.

याच संधीचा फायदा घेत बुलढाणा जिल्ह्यातील दाम्पत्य नागेश हिवराळे आणि त्याची पत्नी ज्योती नागेश हिवराळे, मुख्य आरोपी सुपेश महादेव (पाचपोर वय वर्ष 23, राहणार बाबुळगाव, तालुका जळगाव जामोद) यांनी घेतला.पीडितेला नवस फेडण्याचा सल्ला देण्यात आला. बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील आसरा माता देवी या मंदिरात नवस करण्याचा सल्ला महिलेला देण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनीच तिघे जण नवस करण्यासाठी दोनद खुर्द येथील आसरा मंदिरात आले आणि नवस केल्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका लॉजवर गेले.यावेळी महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक शोषण करण्यात आले. त्यानंतर पीडित महिलेला पुण्यात सोडून दिले. त्यानंतर पीडित महिला हिने सरळ बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठले. तेथे तक्रार दाखल केल्यानंतर ठाणेदार दीपक वारे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तिन्ही आरोपीला अवघ्या सहा तासात अटक केली.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेची बुलढाणा जिल्ह्यातील एका दाम्पत्य व एका तरुणाची सोशल मीडियावर ओळख झाली. पीडित महिलेने तिची आपबीती सांगितली की तिला मूल बाळ होत नाही, म्हणून नवस करायचा आहे, एखादे चांगले नवस करण्यासाठी ठिकाण सांगावे, अशी पोस्ट टाकली. त्यानंतर या घटनेतील आरोपीने बार्शीटाकळी तालुक्यामधील पिंजर पोलीस ठाणे अंतर्गत येणारे दोनद खुर्द येथील आसरा मंदिरात येण्याचे सांगितले.पोलिसांनी तिन्ही आरोपींचा शोध घेत बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.