9 वर्षांच्या चिमुकलीच्या धाडसाला सलाम, 1800 फूट खोल कोकण कड्यावरून रॅपलिंग करत ऐतिहासिक विक्रम, व्हिडीओ बघाच.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांची सफर म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक लेक भविष्यात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील उंचावल यात शंका नाही.सध्याच्या डिजिटल आणि फास्ट युगामध्ये आजची जनरेशन एक प्रकारे नेक्स्ट जनरेशन म्हणावी लागेल. कारण आजकालचे चिमुकले हे झटपट कला अवगत करणे ,धाडसी उपक्रम साध्य करणे याकडे त्यांचा अभ्यासासोबत दिवसेंदिवस कल वाढत आहे.महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांचे सौंदर्य आणि येथील शिखरे, किल्ले जगभरातील पर्यटकांना तसेच देशातील, महाराष्ट्रातील तरुणांना नेहमीच पर्यटनासाठी, ट्रेकिंगसाठी आकर्षित करत असतात.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांची सफर म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.

आणि बुलढाणा जिल्ह्यातील एक लेक भविष्यात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील उंचावल यात शंका नाही .तिच्या या यशामुळे तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरी वर्गात शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनुने हिने केवळ वयाच्या नवव्या वर्षी 1800 फूट खोल कोकण कड्यावरून रॅपलिंग करत ऐतिहासिक विक्रम केला. तिच्या या धाडसी कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सिद्धीने पहाटे हरीशचंद्र गडावर चढाई करून तारामती शिखर गाठले.

सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी रॅपलिंग सुरू करून दुपारी साडेबारा वाजता कोकणकड्यावरून यशस्वी उतरण केली. तिच्या या धाडसाला हिमॉडेलट्रेक एडवेंचर संस्थेने सह्याद्रीची हिरकणी ही उपाधी बहाल केली आहे.सिद्धीने याआधीही 26 जानेवारी 2025 रोजी हिमालयातील 12500 फूट उंचीचा केदार कंठा कडा सर केला असून तेथेही तिने तिरंगा फडकला होता. कोकण कड्यावरून रॅपलिंग ची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. नुकतेच तिला या संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून सिद्धीने संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नाव देखील उंचावले असल्याच्या प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिल्या. यापुढे देखील तिला ते अनेक धाडसी उपक्रमाकरिता प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.