गोमांस विक्री : पोलिसांनी दांपत्याला केली अटक.

रावेर शहरातील कुरेशी मोहल्ला परिसरात गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले. ही पंधरा दिवसांतील तिसरी मोठी कारवाई असून, त्यामुळे अवैध गोमांस विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.सविस्तर वृत्त असे कि, गुप्त माहितीच्या आधारे रावेर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने दिनांक १४ मे रोजी सकाळी धाड टाकली.

धाड टाकताना नजमाबी मोहम्मद हुसेन भतीयारा (वय ३७) व तिचा पती मोहम्मद हुसेन अहमद हुसेन भतीयारा (वय ५५) हे गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कापताना आढळले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दांपत्याला अटक केली. मात्र, त्यांना मदत करणारा तिसरा इसम गल्लीचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला.

या कारवाईत ४० हजार किमतीचे गोमास, कुन्हाड, सुरे जप्त केले आहे. कारवाई प्रसंगी पो. ना कल्पेश आमोदकर, पोकों प्रमोद पाटील, महेश मोगरे, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, सचिन घुगे उपस्थित होते. पुढील तपास पो.ना कल्पेश आमोदकर हे करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.