सोने व्यापाऱ्याला त्याच्याच कारचालकाने घातला गंडा, सव्वा तीन कोटींचे सोने घेऊन पसार.

कारचालक असेल किंवा रिक्षाचालक यांनी आपल्या वाहनात मिळालेले अनेक मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत केल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहतो. मात्र काही चालक याला अपवादही ठरतात. यातच व्यापाऱ्याला त्याच्याच कारचालकाने सव्वा तीन कोटींचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब शिर्डीतून समोर आली आहे.कारचालक असेल किंवा रिक्षाचालक यांनी आपल्या वाहनात मिळालेले अनेक मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत केल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहतो. मात्र काही चालक याला अपवादही ठरतात. यातच व्यापाऱ्याला त्याच्याच कारचालकाने सव्वा तीन कोटींचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब शिर्डीतून समोर आली आहे. शिर्डी येथील एका हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे सुमारे साडेतीन किलो वजनाचे सोने आणि ४ लाख रोकड चोरीला गेली आहे. याप्रकरणी सोन्याचे व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन त्याच्याच चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (वय ३५, रा. आवाल घुमटी, गुजरात) यांचात चालक सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. चौहटन, राजस्थान) याने ही कोटींची चोरी केली आहे. खिशी हे मुंबईतील त्यांच्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून सुमारे ४ किलो ८७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ७ मे ला शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि कार चालक सुरेश कुमार होते. ते हॉटेल साई सुनीताच्या रूम नंबर २०१ मध्ये मुक्कामी होते. खिशी हे अहिल्यानगर ते मनमाडपर्यंत विविध सराफ दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात होते. दिवसभर फिरल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये परत मुक्कामी येत होते. १३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जेवण करून ते रूममध्ये झोपले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग रुममध्ये बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवलेली होती. रूम आतून लॉक होती. मालक व दोघे कामगार एकाच रुममध्ये थांबले होते.

१४ मे ला सकाळी ६ वाजता खिशी यांचा चुलतभाऊ शैलेंद्रसिंह हा त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर आला. त्याने रूमचा दरवाजा उघडला असता तो उघडा होता. आत पाहिले तर चालक सुरेश कुमार रूममध्ये नव्हता. त्याचा मोबाइल फोन आणि कपडे रूममध्येच होते. हॉटेल आणि मंदिर परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर खिशी यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग तपासली असता, त्यातील सुमारे ३.५ किलो वजनाचे ३ कोटी २२ लाख रुपये किमतीचे विविध सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले.व्यापारी खिशी यांच्या माहितीनुसार, चालक सुरेश कुमार हा त्यांच्याकडे दोन महिन्यांपासून कामाला होता. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने विश्वासघात करून चोरी केल्याची त्यांची तक्रार आहे. प्रकऱणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.