शेतकरी बांधवांनी डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा — कृषी विभागाचा सल्ला.

शेतकरी बांधवांनी डिएपी खतास पर्यायी खतांचा वापर करावा — कृषी विभागाचा सल्ला. महाराष्ट्र राज्य मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबवणारे आघाडीचे राज्य आहे. सध्या राज्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू असून, डिएपी खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिएपीमध्ये १८ टक्के नत्र व ४६ टक्के स्फुरद हे प्रमुख अन्नद्रव्ये असतात.

डिएपी खताची संभाव्य कमतरता लक्षात घेता, त्यास पर्यायी खतांचा वापर करणे गरजेचे ठरत आहे. यामध्ये एसएसपी (Single Super Phosphate) हे सर्वाधिक वापरले जाणारे पर्यायी खत असून, त्यात १६ टक्के स्फुरद, सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त एसएसपीचा वापर फायदेशीर आहे. डिएपीच्या एका गोणीऐवजी, अर्धी गोणी युरिया व तीन गोणी एसएसपी यांचा समन्वयित वापर डिएपीस योग्य पर्याय ठरतो.

तसेच, एनपीके (NPK) प्रकारातील संयुक्त खते जसे की NPK 10:26:26 NPK 20:20:0:13 NPK 12:32:16NPK 15:15:15 यांच्या वापरामुळे पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश या तीनही प्रमुख अन्नद्रव्यांचा समतोल पोषण मिळतो. त्यामुळे या संयुक्त खतांचा उपयोगही पिकांसाठी उपयुक्त ठरतो.टिएसपी (Triple Super Phosphate) हे आणखी एक प्रभावी पर्यायी खत असून, त्यामध्ये ४६ टक्के स्फुरद आढळतो. डिएपीच्या एका गोणीच्या बदल्यात अर्धी गोणी युरिया व एक गोणी टिएसपी वापरल्यास तोही डिएपीला उत्तम पर्याय ठरतो.कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, खरीप हंगामात केवळ डिएपी खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा योग्य प्रकारे वापर करावा, जेणेकरून पेरणी व उत्पादनात अडथळा येणार नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.