कॉलेज मधून पेपर सोडवून निघाली, जीवनाची परीक्षा मात्र अधुरी राहिली, कंटेनरच्या धडकेत बीएससीची विद्यार्थीनी जागीच ठार.

साक्षी देशमुख व साक्षी ढाणे या मैत्रिणी साताऱ्यातील वाय. सी. कॉलेजला बी. एस. सीच्या तृतीय वर्षात शिकत होत्या. बुधवारी परीक्षेचा पेपर झाल्यानंतर साताऱ्यातून महामार्गावरून साक्षी ढाणे हिची चेतक मोपेड (एमएच ११ डीक्यु ३५३० ) वरून सातारा ते कराड लेनवरून प्रवास करत होत्या.यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजमध्ये परीक्षा देऊन घरी निघालेल्या युवतीवर काळाने झडप घातली. पुणे- बंगळूर महामार्गावरील बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने मोपेडवरील युवती कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली तर एक युवती गंभीर जखमी झाली. साक्षी सचिन देशमुख (वय 22, रा. तारळे, ता. पाटण) असे ठार झालेल्या युवतीचे नाव आहे, तर साक्षी अमृत ढाणे (वय 21, रा. पाडळी, ता. सातारा) ही जखमी झाली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, साक्षी देशमुख व साक्षी ढाणे या मैत्रिणी साताऱ्यातील वाय. सी. कॉलेजला बी. एस. सीच्या तृतीय वर्षात शिकत होत्या.

बुधवारी परीक्षेचा पेपर झाल्यानंतर साताऱ्यातून महामार्गावरून साक्षी ढाणे हिची चेतक मोपेड (एमएच ११ डीक्यु ३५३० ) वरून सातारा ते कराड लेनवरून प्रवास करत होत्या. पाटेश्वरनगर येथे आल्या असता पाठीमागून येणाऱ्या कंटेनर (एचआर ६१ डी ९५२५) चा धक्का दुचाकीच्या आरशाला बसला. त्यावेळी दुचाकी घसरली. घसरलेल्या गाडीवरून साक्षी देशमुख खाली पडली व कंटेनरसोबत फरफटत जाऊन कंटेनरच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने ती जागीच ठार झाली. अपघात पाहून जवळच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाळवेकर, पीएसआय स्मिता पाटील, हवालदार जयवंत बुधावले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृत साक्षी देशमुख तसेच जखमी साक्षी ढाणे या दोघींना नागठाणे आरोग्य केंद्रात नेले. अपघातानंतर कंटेनर चालकाने पसार झाला आहे. अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास उपनिरिक्षक डी. बी. कारळे करत आहेत.अपघातात मृत झालेली साक्षी देशमुख तारळे विभागातून साताऱ्याला शिक्षणासाठी येत होती. आज परिक्षेचा पेपर देऊन घरी परतत असताना तिच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे शालेय परिक्षेला सामोऱ्या गेलेल्या साक्षीची जीवनाची परिक्षा मात्र अधुरी राहिली. अपघातस्थळी साक्षीचा मृतदेह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.