उज्ज्वला वारुळेंनी जीव दिला नाही! पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती, वाघोलीत घटनेत ओढणीमुळे नवा ट्विस्ट.

सुरुवातीला पोलिसांनी याची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली होती. मात्र, उज्ज्वला यांचा शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांमुळे हत्येचा खुलासा झाला.वाघोली येथे दोन दिवसांपूर्वी पती पत्नीने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र आता शवविच्छेदन अहवालतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीने अगोदर पत्नीला मारहाण करुन तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्याच्या शांत चेहऱ्यामागे अनेक वादळं दडल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहेनागनाथ वारुळे (वय 42) आणि पत्नी उज्ज्वला वारुळे ( वय 40) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वारुळे कुटुंब फळ विक्रीचा व्यवसाय करत होते. शांत आणि सुस्वभावी दाम्पत्य म्हणून त्यांचा परिचय होता.

आर्थिक अडचणीतून दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता.वाघोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री घडली. सुरुवातीला पोलिसांनी याची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली होती. मात्र, उज्ज्वला यांचा शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांमुळे हत्येचा खुलासा झाला.घटनास्थळी लोखंडी हातोडा, चाकू आणि रक्ताने माखलेली ओढणी आढळली. उज्ज्वला यांच्या शरीरावरील जखमांचे निशाण आणि शवविच्छेदन अहवालातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.तपासात असे निष्पन्न झाले की, नागनाथ यांनी पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत:चा जीव घेतला.

या प्रकरणी वाघोली पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनीच या प्रकारणात फिर्याद दिली आहे.या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाघोली पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा आहे. स्थानिकांनी या घटनेमुळे धक्का बसल्याची भावना व्यक्त केली आहे. पोलिसांनी पुढील तपासासाठी घटनास्थळावरील पुरावे ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.