भीषण दुर्घटना! दिल्लीला निघालेली बस आगीच्या भक्ष्यस्थानी; पाच जणांचा दुर्दैवी अंत.

उत्तरप्रदेशातून मोठी दुर्घटना समोर आली आहे. लखनऊच्या कल्ली पश्चिममध्ये एका खाजगी स्लीपर बसला भीषण आग लागली आहे. ही बस ६० प्रवांशाना घेऊन बिहारहून दिल्लीला निघाली होती. यामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.उत्तरप्रदेशातून मोठी दुर्घटना समोर आली आहे. लखनऊच्या कल्ली पश्चिममध्ये एका खाजगी स्लीपर बसला भीषण आग लागली आहे. ही बस ६० प्रवांशाना घेऊन बिहारहून दिल्लीला निघाली होती. यामधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांची समावेश आहे. वृत्तानुसार, ही बस बिहारहून दिल्लीला निघाली असता सकाळी ५ वाजता मोहनलालगंजजवळ बाह्य रिंग रोडवर जे किसान पथ म्हणून ओळखले जाते. येथे घडला. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत असल्याचे माहिती आहे.

प्रवाशांनी सांगिते, चालत्या बसमध्ये अचानक धुराचे लोट येऊ लागले, ज्यामुळे घबराट पसरली होती. काही मिनिटांतच आगीच्या जोरदार झळा बसू लागल्या. पण बस चालक आणि कंडक्टर बस सोडून पळून गेले. ड्रायव्हरच्या सीटजवळ एक अतिरिक्त सीट असल्याने प्रवाशांना खाली उतरण्यास अडथळा आला. ज्यामुळे घाईघाईत उतरताना अनेक प्रवासी अडकले आणि पडले. परिसरातील लोकांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला ही माहिती दिली आहे.घटनेची माहिती मिळताच पीजीआय, मोहनलालगंज, सुशांत गोल्फ सिटी पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसीपी रजनीश वर्मा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने बचाव कार्याच्या धुरा सांभाळली. पोलिसांनी बसमधून मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले.

डबल-डेकर बसमधील आग विझवण्यासाठी अर्धा डझन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, आग आटोक्यात आली आहे. पण बसमधील प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे.वृत्तानुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. अग्निशमन दल ३० मिनिटांत तेथे पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. बसच्या आतून पाच जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला नाही, ज्यामुळे मागे बसलेले लोक अडकले होते. बसमध्ये प्रत्येकी पाच किलोचे सात गॅस सिलिंडर होते, परंतु एकाही सिलिंडरचा स्फोट झाला नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.