घाटातल्या वळणावर तीन बहिणी आडव्या आल्या, इमर्जन्सी ब्रेक दाबला अन् धडामssss डंपर जागेवर पलटी, पण देव तारी त्याला….

सातारा शहराच्या दिशेने कास बाजूकडून वाळूने भरलेला डंपर भरधाव वेगाने येत होता. पॉवर हाऊस झोपडपट्टी येथील पाच मुली यवतेश्वर घाटात फिरायला गेल्या होत्या. फिरत असताना त्या रस्ता ओलांडत होत्या. अवघड वळणावर समोरून आलेला डंपर त्यांना दिसला नाही.कासवरून साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरचालकाने पादचाऱ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक दाबल्याने घाटातच डंपर पलटी झाला. या अपघातात तीन मुलींना धडक बसली असून तिनही मुली सख्ख्या मामे बहिणी आहेत. दरम्यान, अपघातानंतर डंपरचालक पसार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दीक्षा अशोक मुरारी (वय १५), अमुल्या अशोक मुरारी (वय १७) व अक्षरा शंकर कांबळे (वय १७, तिघी रा. मंगळवार पेठ, सातारा) अशा जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत. एका मुलीला डिस्चार्ज दिला असून दोघींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत तालुका पोलीसांनी सांगितले की, सातारा शहराच्या दिशेने कास बाजूकडून वाळूने भरलेला डंपर भरधाव वेगाने येत होता. पॉवर हाऊस झोपडपट्टी येथील पाच मुली यवतेश्वर घाटात फिरायला गेल्या होत्या. फिरत असताना त्या रस्ता ओलांडत होत्या. अवघड वळणावर समोरून आलेला डंपर त्यांना दिसला नाही. घाटातल्या वळणावर अचानक मुली रस्ता ओलांडत असल्याचे डंपर चालकाच्या निदर्शनास येताच त्याने त्या मुलींना वाचवण्यासाठी ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्याने डंपर जागीच पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. या अपघातात तीन मुली जखमी झाल्या. तसेच डंपर चालकही किरकोळ जखमी झाला. यावेळी डंपरमधील वाळू रस्त्यावर पडली होती. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य करून त्याची माहिती पोलिसांना दिली.

सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे जवान विशाल मोरे हे घटनास्थळी पोहचले. तसेच शाहुपूरी पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे जवानही घटनास्थळी पोहचले. जखमी मुलींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले. जखमीमधील एका मुलीला डिस्चार्ज दिला असून दोघींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील डंपर चालक पळून गेला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या अपघाताची नोंद रात्री उशिरा शाहुपूरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.