खामगाव येथे किसान ब्रिगेडच्या कर्ज मुक्ती अभियानाला शेतकर्‍यांचा प्रतिसाद.

निवडणूक काळात शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करु, असे आश्वासन देऊन सत्तेत विराजमान झालेल्या राज्यातील महायुती सरकारला शेतकर्‍यांच्या वेदनांचा विसर पडला आहे. राज्यातील शेतकरी कर्ज मुक्त व्हावा, यासाठी किसान ब्रिगेडने सुरु केलेले ( कर्ज मुक्ती अभियानाला खामगाव येथील शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी दि.१४ मे रोजी तहसील कार्यालयात कर्ज माफिचे अर्ज भरुन निवेदन दिले.

सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकर्‍यांना कर्ज मुक्ती मिळावी, यासाठी शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे संस्थापक व दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांचेवतीने कर्जदार शेतकर्‍यांकरीता कर्ज मुक्ती अर्ज अभियान राबविले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधार्‍यांनी सत्तेत आल्याबरोबर शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करु, असे आश्वासन देण्यात आले होते.आश्वासनावर शेतकर्‍यांची मते घेऊन सत्तेत विराजमान झाले. मात्र सत्ता प्रस्थापित केल्यानंतर शासनाला तसेच वचननाम्यात नमूद केलेल्या सत्ताधारी पक्षाला शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा विसर पडला. शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने फूसून थट्टा केली. शेतकर्‍यांची कर्ज माफी व्हावी, त्यासोबतच शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा, याकरीता किसान ब्रिगेडच्या माध्यमातून किसान कर्जमाफी अभियान राबविण्यात आला.या अभियानाला बुलढाणा जिल्ह्यात शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी अर्ज भरुन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनी शेतकरी किसान कर्ज मुक्ती अभियानात सहभागी होऊन किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा निर्धार यावेळी घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनी शेतकरी बांधव उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.