लेखापरिक्षण केलेले चौथ्या तिमाहीसह वार्षिक निकाल जाहिर .मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी निविष्ठा यांच्या उत्पादनामध्ये गुंतलेलल्या जगातील दुसऱ्या व भारतातील सगळ्यात मोठ्या ठिंबक सिंचन प्रणालीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड (BSE: 500219 / NSE: JISLJALEQS), या कंपनीचे ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीचे आणि वर्षाचे लेखापरीक्षण केलेले (ऑडिटेड) Consolidated आणि Standalone निकाल जाहीर करण्यात आले. यात कंपनीला वर्षाच्या एकत्रित करपश्चात नफा (PAT) २५.७ कोटी रूपये झाला आहे.जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव येथे आज (दि. १४) ला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या चौथी तिमाही आणि आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण मंजूर करण्यात आले.










